काशीबाई कानिटकर

काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ - इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.

काशीबाई कानिटकर
जन्मइ.स. १८६१
अष्टे, महाराष्ट्र
मृत्यूइ.स. १९४८
राष्ट्रीयत्वमराठी भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी
विषयस्त्रीवाद
पतीगोविंद वासुदेव कानिटकर

जीवन

काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला[१]. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या[२].

काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत[२]. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.

काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या[२].

कादंबरी

  • रंगराव
  • पालखीचा गोंडा

कथा संग्रह

  • शेवट तर गोड झाला
  • चांदण्यातील गप्पा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन