कॉलोराडो स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर
(कॉलोराडो स्प्रिंग्ज या पानावरून पुनर्निर्देशित)
विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १०,०००वा लेख आहे.


कॉलोराडो स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर एल पासो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहराला नुसते स्प्रिंग्ज असेही संबोधतात.

कॉलोराडो स्प्रिंग्ज
Colorado Springs
अमेरिकामधील शहर


ध्वज
कॉलोराडो स्प्रिंग्ज is located in कॉलोराडो
कॉलोराडो स्प्रिंग्ज
कॉलोराडो स्प्रिंग्ज
कॉलोराडो स्प्रिंग्जचे कॉलोराडोमधील स्थान
कॉलोराडो स्प्रिंग्ज is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कॉलोराडो स्प्रिंग्ज
कॉलोराडो स्प्रिंग्ज
कॉलोराडो स्प्रिंग्जचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°51′48″N 104°47′31″W / 38.86333°N 104.79194°W / 38.86333; -104.79194

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष जून १९, इ.स. १८८६
क्षेत्रफळ ४८२.१ चौ. किमी (१८६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ७,२०० फूट (२,२०० मी)
किमान ६,०३५ फूट (१,८३९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,१६,४२७
  - घनता ७६७.३ /चौ. किमी (१,९८७ /चौ. मैल)
  - महानगर ६,४५,६१३
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.springsgov.com

कॉलोराडो स्प्रिंग्ज हे कॉलोराडो राज्याच्या भौगोलिक मध्यस्थानाच्या किंचित पूर्वेस व राज्याची राजधानी डेन्व्हरमधील स्टेट कॅपिटोलपासून १०१ कि.मी. दक्षिणेस वसलेले आहे. स्प्रिंग्ज समुद्रसपाटीपासून १,८३९ मी. (६,०३५ फूट) उंचीवर आहे व शहरातील वस्तीचा काही भाग ६,८०० फूटांपर्यंत उंचीवर आहे. हे शहर रॉकी माउंटन्स या पर्वतमालेच्या पूर्व सीमेवर पाइक्स पीक या अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध डोंगरांपैकी एकाच्या पायथ्याशी आहे.

अमेरिकेच्या वस्तीगणना केंद्राच्या अंदाजानुसार कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरात ३,६९,८१५ व्यक्ती राहतात तर स्प्रिंग्जच्या नागरी भागाची वस्ती ५,८७,५०० आहे. या आकड्यांनुसार स्प्रिंग्ज हे अमेरिकेतील ४९वे मोठे शहर आहे.

कॉलोराडो स्प्रिंग्ज गावाची स्थापना इ.स. १८७१मध्ये श्रीमंत लोकांचे सुट्टी घालवण्याचे ठिकाण म्हणून झाली होती. कालांतराने जवळच्या सोने व चांदीच्या खाणींना बरकत आली व शहराचेही रूप बदलले. सद्यस्थितीत कॉलोराडो स्प्रिंग्ज हे सैनिकी व प्रवासी व थंड हवेचे ठिकाण झालेले आहे. मनी या नियतकालिकाच्या मते कॉलोराडो स्प्रिंग्ज हे अमेरिकेतील ३,००,००० किंवा अधिक वस्ती असलेल्या शहरांपैकी राहण्यासाठी प्रथम क्रमांकाचे शहर आहे.[१]

इतिहास

सुरुवात

कॉलोराडो स्प्रिंग्ज शहराची स्थापना ऑगस्ट इ.स. १८७१मध्ये जनरल विल्यम पामरने केली. पामरने हे शहर श्रीमंत लोकांना सुट्टी घालवण्यासाठीचे रिसॉर्ट करण्याचे ठरवले होते. लवकरच अनेक इंग्लिश लोक येथे येउन राहिले व त्यामुळे शहराला लिटल लंडन असे नाव मिळाले. पामरने येथे अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ॲंटलर्स होटेल उघडले. स्प्रिंग्जच्या स्वच्छ व कोरड्या हवामानाचा फायदा घेण्यासाठी अनेक स्वास्थ्यप्रेमी लोकही येथे येउन रहायला लागले. शहराची वाढ होऊ लागताच पामरने डेन्व्हर अँड रियो ग्रांदे रेलरोड ही रेल्वे कंपनी सुरू केली व स्प्रिंग्ज अमेरिकेच्या इतर शहरांशी रेल्वेने जोडले गेले. पामर व त्याच्या पत्नीने कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये अनेक समाजसेवी संस्था सुरू केल्या व शहराच्या भरभराटीला कारणीभूत ठरले.

ओल्ड कॉलोराडो सिटी व पाइक्स पीक गोल्ड रश

जनरल पामरने शहरासाठीची जागा कॉलोराडो सिटी नावाच्या छोट्या गावापासून जरा दूरच निवडली कारण कॉलोराडो सिटीतील रहिवाशी मुख्यत्वे आसपासच्या सोन्याच्या खाणीतील कामगार होते. तेथील वातावरण हे कुटुंबाभिमुख नसल्यामुळे पामरने कॉलोराडो सिटीच्या बाहेरील जमिनीचा मोठा पट्टा स्वतः विकत घेतला व त्यापलीकडे नवीन शहर वसवले. कॉलोराडो सिटीत दारू व इतर व्यसनांची रेलचेल होती तर कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये दारूबंदी. स्प्रिंग्जमधील दारूबंदी इ.स. १९३३मधील राष्ट्रीय दारूबंदी नाहीशी होईपर्यंत होती.

विसावे शतक

एकोणिसाव्या शतका अखेर सोने व चांदीचे उत्पादन व स्थानिक अर्थतंत्रातील महत्त्व कमी झाले. कॉलोराडो सिटीपेक्षा आता कॉलोराडो स्प्रिंग्जची भरभराट जास्त जोमाने होऊ लागली. येथील कोरड्या व स्वच्छ हवेमुळे पर्यटक तसेच क्षयरोगी येथे आकर्षित झाले.

विसाव्या शतकाच्या शेवटी

गॅझेट, कॉलोराडो स्प्रिग्समधील वर्तमानपत्र

कॉलोराडो स्प्रिंग्जमधील सर्वप्रथम सैनिकतळ इ.स. १९४२च्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर उभारण्यात आला. अमेरिकेच्या पायदळाने शहराच्या दक्षिणेस कॅम्प कार्सन या नावाने हा तळ उभारला. येथे दुसऱ्या महायुद्धात जाणाऱ्या सैनिंकांना प्रशिक्षण देण्याची व युद्धभूमीवर जाईपर्यंत त्यांना राहण्याची सोय करण्यात आली. याच सुमारास लष्कराने शहराचा विमानतळ वापरण्यास सुरुवात केली. याचे पीटरसन फील्ड असे नामकरण करून याचा वापर वैमानिकांना जड बॉम्बफेकी विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येऊ लागला.

भूगोल

कॉलोराडो स्प्रिंग्ज शहर ३८°५१′४८″ उत्तर अक्षांश, १०४°४७′३१″ पश्चिम रेखांशावर आहे (३८.८६३४४३, -१०४.७९१९१४).

शहराचे क्षेत्रफळ अंदाजे १८६ चौरस मैल (४८२ कि.मी. आहे.

हवामान

कॉलोराडो स्प्रिंग्ज साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से)73
(23)
76
(24)
81
(27)
87
(31)
95
(35)
100
(38)
102
(39)
101
(38)
94
(34)
86
(30)
78
(26)
77
(25)
102
(39)
सरासरी कमाल °फॅ (°से)41.7
(5.4)
45.4
(7.4)
51.6
(10.9)
59.2
(15.1)
68.4
(20.2)
79.2
(26.2)
84.4
(29.1)
81.6
(27.6)
74.1
(23.4)
63.4
(17.4)
49.8
(9.9)
42.4
(5.8)
61.77
(16.53)
सरासरी किमान °फॅ (°से)14.5
(−9.7)
18.0
(−7.8)
23.9
(−4.5)
31.4
(−0.3)
40.7
(4.8)
49.5
(9.7)
54.8
(12.7)
53.6
(12)
45.4
(7.4)
34.3
(1.3)
22.6
(−5.2)
15.6
(−9.1)
33.69
(0.94)
विक्रमी किमान °फॅ (°से)−32
(−36)
−27
(−33)
−11
(−24)
−3
(−19)
21
(−6)
32
(0)
42
(6)
39
(4)
22
(−6)
5
(−15)
−11
(−24)
−27
(−33)
−32
(−36)
सरासरी वर्षाव इंच (मिमी)0.28
(7.1)
0.35
(8.9)
1.06
(26.9)
1.62
(41.1)
2.39
(60.7)
2.34
(59.4)
2.85
(72.4)
3.48
(88.4)
1.23
(31.2)
0.86
(21.8)
0.52
(13.2)
0.42
(10.7)
17.4
(441.8)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी)5.1
(13)
5.1
(13)
9.5
(24.1)
6.3
(16)
1.4
(3.6)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.5
(1.3)
3.6
(9.1)
5.6
(14.2)
6.1
(15.5)
43.2
(109.8)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)4.74.47.58.710.79.912.213.47.55.15.05.094.1
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)5.14.45.94.00.80000.41.84.05.031.4
स्रोत #1: The Weather Channel[२]
स्रोत #2: NOAA[३]

वाहतूक

विमानवाहतूक

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ असल्याने येथील प्रवासी अनेकदा हाच विमानतळ पसंत करतात. वेस्टर्न पॅसिफिक एरलाइन्स या विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय १९९५ ते १९९८पर्यंत कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळावर होते.

वाल्डो कॅन्यन वणवा

जून २४, इ.स. २०१२ रोजी कॉलोराडो स्प्रिंग्ज जवळील वाल्डो कॅन्यन या घळीत वणवा लागला. पुढील तीन दिवसात जंगल व डोंगरावरून रोरावत हा वणवा जून २६ च्या संध्याकाळी शहराच्या पश्चिमेस येउन ठेपला. यात दोन व्यक्ती मृत्यू पावल्या, अंदाजे १८,००० एकर जंगल जळून गेले तसेच ३५५ घरे जळाली.

ब्लॅक फॉरेस्ट वणवा

वाल्डो कॅन्यन वणव्यानंतर एक वर्षाच्या आत जून ११, इ.स. २०१३ रोजी शहराच्या पूर्वेस असलेल्या ब्लॅक फॉरेस्ट भागात वणवा पेटला. यात १४,२८० एकर जंगल आणि अंदाजे ५०० घरे जळाली. या आगीत दोन व्यक्ती मृत्यू पावल्या.

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

राफ्टिंग कंपनी कॉलोराडो स्प्रिंग्ज स्तिथ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन