गजह मद


गजह मद (सी. १२९० ते सी. १३६४) हे जवानी जुन्या पांडुलिपि, कविता व पौराणिक कथा, महासभातील हिंदू साम्राज्याचे एक शक्तिशाली सैन्य नेते आणि मजपहीत किंवा (पंतप्रधान) पंतप्रधान यांच्यासमान हुद्द्यावर होते. मजपहीत साम्राज्याला त्याच्या वैभवाच्या शिखरावर आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते. [१]:234,239 त्याने सौमपा पालपा नावाची शपथ दिली, ज्यात त्याने मजपहीत साम्राज्यासाठी दक्षिणपूर्व आशियाई द्वीपसमूहापर्यंत विजय मिळवेपर्य्ंत तपस्वी (अन्नात मसाल्यांच्या उपभोग न घेण्याचे व्रत) बनून जगण्याची शपथ घेतली होती. [२] आधुनिक इंडोनेशियामध्ये तो एक महत्त्वाचा राष्ट्रीय नायक मानला जातो. [३] तसेच त्यांना देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीकही मानले जाते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना एक महत्त्वाचे स्ठान वायंगंग कुलिट (चामड्याची कठपुतळी)च्या नाटकांमध्ये मिळाले. वायंगंग कुलिटची नाटके रामयण आणि महाभारत यासारख्या हिंदू महाकाव्यांपासून प्रेरीत असतात. [४]

गजह मद
मजपहित साम्राज्य
कार्यालयात
इ.स. १३२९ (1329) – c.1364 (c.1364)
Monarchमजपहित साम्राज्य
वैयक्तिक माहिती
मृत्यूc.१३६४
धर्मबुद्ध

त्याच्या जीवनाचे राजकीय आणि प्रशासकीय असे अनेक दाखले बऱ्याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वाची पुस्तकांपैकी पॅरात्रोन ("किंग्स ऑफ द किंग्स"), नागकार्रेगगामा (१४ व्या शतकातील एक जावा भाषांतील महाकाव्य) आणि १३ व्या आणि १४ शतकातील शिलालेख आहेत.

उदय

गजह मदच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. पण त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. जुन्या काही अहवालांमध्ये त्याच्या करकिर्दीची सुरुवात भायंगकाराचा नायक म्हणून झाल्याचा उल्लेख आहे. तो मजहपीत राजा आणि शाही कुटुंबासाठी एक शाही पहारेकरी होता.

सन १३२१ मध्ये रकरीयन कुट्टी नावाच्या मजापहित मधल्या अधिकाऱ्याने मजापहित राजा जयनेगराविरुद्ध (राज्य काल १३०९ ते १३२८) बंड केल. त्यावेळी गजहा मद आणि तत्कालीन महापती आर्य तादाह यांनी राजा व त्याचे कुटुंब यांना त्रोवुलन (राजधानी) मधून पलायन करण्यास मदत केली. नंतर गजहा मद ने राजाला बंड मोडून काढण्यास मदत केली आणि राजधानीकडे परत आणले. परंतु सात वर्षांनंतर, रकरीयन कुट्टीच्या सहाय्यकांपैकी एकम् रकरीयन तंका, यांने जयनेगराचा खून केला.

इतिहासाच्या एका आवृत्ती मध्ये असेही सुचविण्यात आले की १३२८ मध्ये गजह मद यानेच मजापहित राजा जयनेगरा याचा वध केला. राजा जयनेगरा हा त्याच्या दोन चुलत बहिणींच्या सुरक्षेच्या बाबतीत जास्तच सतर्क होता. याच दोन तरुण राजकुमारींच्या तक्रारीमुळे गजह मद ने हस्तक्षेप केला. त्याने शस्त्रक्रिया करण्यास सांगताना सर्जनलाच राजाचा खून करण्याची व्यवस्था केली होती.

राजा जयनेगराच्या म्रुत्युनंतर त्याच्या चुलत बहिण त्रिभुवन तुंगादेवी (राज्य काल १३२८ ते १३५०) हीने राज्याची धुरा हाती घेतली. हेच्याच नेतृत्वाखाली गजह मद याला १३२९ मध्ये मजापहित राज्याचा पंतप्रधान नियुक्त करण्यात आले होते. तत्पुर्वी आर्य तादाह यांना निवृत्ती देण्यात आली होती.

त्रिभुवन तुंगादेवीच्या खाली गजहा मद यांनी १३३१ मध्ये सडेंग आणि केता यांचे बंड मोडून काढले.

सणा १३४५ च्या सुमारास गजह मद याच्या शासनकाळात, मुस्लिम प्रवासी इब्न बतूता यांनी सुमात्राला भेट दिली.

संदर्भ