गॅरी कास्पारोव्ह

रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि राजकीय कार्यकर्ता

गॅरी कास्पारोव्ह (रशियन: Га́рри Ки́мович Каспа́ров) (जन्मावेळी गॅरीक किमोवीच वेईनस्टीन एप्रिल १३, इ.स. १९६३, बाकू, अझरबैजान, यु.एस.एस.आर.) हा रशियन बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे.कास्पारोव्ह' इ.स. १९८५ मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब १९९३ पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंतर फिडेबरोवर झालेल्या वादामुळे त्याने प्रोफेशनल चेस असोशिएशन सुरू केली. इ.स. २००० मध्ये व्लादिमीर क्रॅमनीक कडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते. १९९७ मध्ये डिप ब्लू संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला.

गॅरी कास्पारोव्ह
Гарри Кимович Каспаров
गॅरी कास्पारोव्ह 2003
पूर्ण नावगॅरी किमोविच कास्पारोव्ह
देशरशियारशिया
सोव्हियेत संघसोव्हियेत संघ
जन्म१३ एप्रिल, १९६३ (1963-04-13) (वय: ६१)
बाकु, अझरबैजान,
सोवियेत संघ
पदग्रॅंडमास्टर
विश्व अजिंक्यपद1985–2000
सर्वोच्च गुणांकन२८५१ (जुलै १९९९)

एलो मानांकनानुसार इ.स. १९८६ ते इ.स. २००५ पर्यंत सतत प्रथम मानांकन मिळविण्याचा आणि आतापर्यंतचे सर्वात जास्त एलो गुण २८५१ मिळविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सलग जास्तीत जास्त स्पर्धा आणि चेस ऑस्कर जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.इ.स. २००५ नंतर कास्पारोव्हने बुद्धिबळातून सन्यास घेऊन राजकारण व लेखन यांकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने संयुक्त नागरी आघाडी स्थापन केली आणि द आदर रशिया संस्थेचा सदस्य बनला. २००८ मधील रशियन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तो सुरुवातीला उमेदवार म्हणून उभा होता; पण नंतर माघार घेतली. जरी जगभरात व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधाचे प्रतीक मानले जात असला तरी रशियामध्ये त्याला कमी जनाधार आहे.[१][२]

सुरुवातीची कारकीर्द

शिखराकडे वाटचाल

१९८४ची विश्व स्पर्धा

विश्वविजेता

फिडेशी काडीमोड

हार

बुद्धिबळातून संन्यास

राजकारण

बुद्धिबळ मानांकनातील कामगिरी

ऑलिंपियाड व इतर सांघिक स्पर्धांतून कामगिरी

इतर विक्रम

पुस्तके व इतर लेखन

संगणकांविरुद्ध

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी