जलमंडल

जलावरण अथवा जलमंडल (प्राचीन ग्रीक ὕδωρ ) [१] [२] हे ग्रह, किरकोळ ग्रह किंवा नैसर्गिक उपग्रहाच्या पृष्ठभागावर, पृष्ठभागाखाली पाताळात आणि वर आढळणारे पाण्याचे एकत्रित वस्तुमान आहे । पृथ्वीचे जलमंडल सुमारे 4 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे, [३] [४] हे जलावरण आकारात बदलत असते । हे समुद्रतळ पसरणे आणि महाद्वीपीय प्रवाहामुळे होते, ज्यामुळे खंडांवरील भूमी व महासागरा खालील भूमी सरकून भू-सागर पुनर्रचना हट राहते । [५]

प्रशांत महासागराच्या बाजूने पृथ्वी चे अंतराळातून घेतलेले चित्र

असे अनुमान आहे की पृथ्वीवर 1.386 अब्ज घन किलोमीटर (333 दशलक्ष घन मैल) पाणी आहे। [६] [७] [८] यामध्ये जमिनीतील ओलावा, भूजल आणि पृथ्वीच्या कवचातील पर्माफ्रॉस्ट (2 किमी खोलीपर्यंत) वायू, द्रव आणि गोठलेल्या स्वरूपात पाणी समाविष्ट आहे; महासागर आणि समुद्र, सरोवरे, नद्या आणि नाले, आर्द्र प्रदेश, हिमनदी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ आणि बर्फाचे आवरण; हवेतील बाष्प, थेंब आणि क्रिस्टल्स; आणि जीवमंडलातील जिवंत वनस्पती, प्राणी आणि एककोशिकीय जीवांचा भाग हे सर्व हयात मोडतात । या रकमेपैकी 97.5% क्षारयुक्त पाण्याचा वाटा आहे, तर गोड्या पाण्याचा वाटा फक्त 2.5% आहे. या गोड्या पाण्यापैकी 68.9% पाणी हे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि पर्वतीय हिमनद्यामध्ये कायमस्वरूपी हिमावरणाच्या स्वरूपात आहे; 30.8% ताजे भूजल स्वरूपात आहे; आणि पृथ्वीवरील ताजे पाण्यापैकी फक्त 0.3% सहज उपलब्ध तलाव, जलाशय आणि नदी प्रणालींमध्ये आहे। [९]

इतिहास

जल - चक्र

संदर्भ आणि नोंदी