डेशिया (रोमन प्रांत)
डेशिया (लॅटिन: Dacia, ग्रीक: Δακία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. हा प्रांत डेशिया ट्राजाना (लॅटिन: Dacia Traiana, ट्राजानचा डेशिया) किंवा डेशिया फेलिक्स (लॅटिन: Dacia Felix, आनंदी डेशिया) या नावांनीही ओळखला जात असे. आजचे ट्रान्सिल्व्हेनिया व रोमानियाचे बानत व ओल्टेना हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स. १०७ मध्ये सम्राट ट्राजान याने हा प्रदेश जिंकून घेतल्यावर पुढील दीडशे वर्षे या प्रांतावर रोमन आधिपत्य होते. परंतु सततच्या परकीय आक्रमणांमुळे डेशियावरील वर्चस्व कायम ठेवणे रोमनांना अधिकाधिक खर्चिक होत गेले. शेवटी सम्राट ऑरेलियन याने २७१ साली या प्रांतातून पूर्णपणे माघार घेतली.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे