डोंबिवली विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - १४३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, डोंबिवली मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ५७ ते ६५. ६८ आणि ७८ ते ९६ यांचा समावेश होतो. डोंबिवली हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे रविंद्र दत्तात्रय चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९रविंद्र दत्तात्रय चव्हाणभारतीय जनता पक्ष
२०१४रविंद्र दत्तात्रय चव्हाणभारतीय जनता पक्ष
२००९रविंद्र दत्तात्रय चव्हाणभारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ