दत्तात्रय पारसनीस

(दत्तात्रय बळवंत पारसनीस या पानावरून पुनर्निर्देशित)


रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (२७ नोव्हेंबर, १८७०; - ३१ मार्च, १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.[ संदर्भ हवा ]

दत्तात्रेय बळवंत पारसनीस
जन्म२७ नोव्हेंबर, १८७०
बोरगांव, कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा
मृत्यू३१ मार्च, १९२६ (वय ५५)
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारइतिहास
प्रसिद्ध साहित्यकृतीहिस्टरी ऑफ द मराठा पीपल
वडीलबळवंतराव पारसनीस
आईबयाबाई पारसनीस

कौटुंबिक माहिती

पारसनिसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त साताऱ्यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनिसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.[ संदर्भ हवा ]

दत्तात्रय पारसनीसांच्या सातारा येथील निवासस्थानी लावलेला नीलफलक

ऐतिहासिक लेखन

पारसनिसांनी जानेवारी १८८७ मध्ये सुभाष्य चंद्रिका नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी इ.स. १८८७ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कोकिळ या मासिकात समाविष्ट केले.[ संदर्भ हवा ] त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत.[ संदर्भ हवा ]

ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनिसांनी भारतवर्ष आणि इतिहास संग्रह नावाची नियतकालिके चालू केली.[ संदर्भ हवा ] भारतवर्ष वर्षभरातच बंद पडले पण इतिहास संग्रह आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.[ संदर्भ हवा ]

ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६ मध्ये, पारसनिसांनी भारतवर्ष नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले.[ संदर्भ हवा ] १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८ मध्ये इतिहास संग्रह नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी नाना फडणीस यांच्या मेणवलीतल्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग पारसनिसांनी त्यांच्या लेखांत केला.[ संदर्भ हवा ]

पारसनिसांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले.[ संदर्भ हवा ] पारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे त्यांनी संग्हित केलेली जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. द.ब. पारसनीस यांनी ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही मोठा संग्रह केला होता.[ संदर्भ हवा ]

लेखन

पारसनिसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ]

मराठी[ संदर्भ हवा ]

  • अयोध्येचे नबाब (१८९१)
  • ए.ओ. ह्यूम (१८९३)
  • कीर्तिमंदिर (१८९२)
  • झाशीची राणी : झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
  • महास्वामीभक्त व पितृभक्त बहिरोबा (१८९६)
  • दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
  • बायजाबाई शिंदे यांचे चरित्र (१९०२)
  • महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
  • मराठ्यांचे आरमार (१९०४)
  • महादजी शिंदे याजकडील राजकारणे - ५ खंड (१९१५)
  • महाबळेश्वर (१९१६)
  • मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार (१९००)
  • सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५).
  • या पुस्तकांखेरीज पारसनीसांनी रावबहादुर गणेश चिमणाजी वाड तसेच पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर काही पुस्तके संपादित केली आहेत.

इंग्लिश ग्रंथ[ संदर्भ हवा ]

  • ट्रीटीज, एन्गेजमेन्ट्स ॲन्ड सनद्ज, बाॅम्बे (सहसंपादक - पी.व्ही. मावजी+जी.सी. लाड)
  • दि सांगली स्टेट (१९१७)
  • पूना इन बायगॉन डेज (१९२१)
  • द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
  • महाबळेश्वर (१९१६)
  • सातारा (१९०९)
  • ए हिस्टरी ऑफ द मराठा पीपल, ३ खंड (सहलेखक सी. ए. किंकेड १९१२–२२), इत्यादी. अखेरचे पुस्तक वगळता उरलेली पुस्तके विविध ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणारी आहेत. विशेषतः ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना उद्देशून ती लिहिलेली आहेत.

संदर्भ

विकिस्रोत
दत्तात्रय पारसनीस हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन