महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन ही भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचे निर्वाचित आणि नियुक्त असे दोन मुख्य भाग आहेत. राज्य संविधानानुसार लोकशाही मार्गाने निवडणूकांत जिंकलेले उमेदवार राज्याच्या मंत्रीमंडळाचा भाग असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर मार्गांनी नियुक्त झालेले अधिकारी व सेवकवर्ग हा शासनाचा दुसरा भाग आहेत.
विशेष लेख
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माणकरुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.
संरचना
महामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट्र शासन ५०% + केंद्रीय वखार महामंडळ ५०%
एकूण मंजूर भाग भांडवल-रु.१५.०० कोटी
प्राप्त भाग भांडवल-रु.८.७१ कोटी
वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते. या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.
...महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय मंत्रालयाच्या सहाव्या तर मुख्य सचिवांचे कार्यालय पाचव्या मजल्यावर आहे?
परिचय
उद्धव ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे (जन्म : २७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडी चे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
सामान्य प्रशासन • मुख्य निवडणूक अधिकारी • माहिती व जनसंपर्क • राजभवन • राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग • मुख्य माहिती आयुक्त • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी • महान्यूज • महाराष्ट्र लोकसेवा आयोग • महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ • महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण
गृहविभाग • महाराष्ट्र राज्य पोलीस • महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग • मुंबई पोलीस • मुंबई वाहतुक पोलीस • महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग ॲन्ड वेल्फेअर कॉरपोरेशन • महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी विभाग
कृषी विभाग • कृषी व पदुम विभाग • महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ • राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक • महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
नगर विकास विभाग • संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य • महाराष्ट्र अग्नीशमन सेवा • महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
वित्त विभाग • शासकीय विमा निधी, विमा संचालनालय • मुल्यवर्धित कर, विक्रीकर विभाग • महाकोष • कोषवाहिनी • अर्थसंकल्प, अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणाली (बीईएमएस) • शासकीय जमा लेखा प्रणाली (जीआरएएस) • निवृत्ती वेतन वाहिनी • महाराष्ट्र राज्य लॉटरी • सार्वजनिक उपक्रमांची माहिती • संचालनालय स्थानिक निधी लेखापरीक्षा
उद्योग विभाग
उद्योग विभाग • महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ • भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय • शासन मुद्रण • लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय • महाईबीज • महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या
अन्न व औषधी प्रशासन • आयुष संचालनालय • हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या. • हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था • वैद्यकीय शिक्षण संचालनालय • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक • महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
जलसंपदा विभाग
जलसंपदा विभाग • महाराष्ट्र जलसंपत्ती विकास प्राधिकरण • तापी पाटबंधारे विकास महामंडळ
विधी व न्याय विभाग
विधी व न्याय विभाग • इंडियन कोर्ट • निबंधक भागीदारी संस्था • नोटरी कक्ष
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग • ई-शिष्यवृत्ती विभाग • बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित • आम आदमी बीमा योजना • महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ • इतर मागासवर्ग विकास महामंडळ • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. • वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ • महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण • महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. • महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्या. • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या.
पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या. • दर्शनिका विभाग • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ • सांस्कृतिक कार्य संचालनालय
अल्पसंख्यांक विकास विभाग
अल्पसंख्यांक विकास विभाग • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान भवन) हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे मुख्यालय असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांची अधिवेशने भरण्याचे नियमित स्थळ आहे. विधिमंडळाच्या मूळ संकल्पनेनुसार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात अधिवेशनांच्या माध्यमामधून महाराष्ट्र राज्याशी संबंधित अनेकविध विषयांवर कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या इमारतीत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद या दोन लोकतांत्रिक सभागृहांमध्ये राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पााला आकार दिला जातो तसेच जनतेशी निगडित विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन त्यांचे निराकरण देखील करण्यात येते. विधिमंडळ अनेक महत्त्वाच्या विषयांवर अधिक अभ्यासपूर्ण चर्चा घडाव्यात या हेतूने त्या विषयांशी संबंधित समित्यांची स्थापना देखील करते. जनतेने आपल्यातून निर्वाचित करून शासनात आपले प्रतिनिधित्त्व करण्यासाठी पाठवलेले लोकप्रतिनिधी सामुदायिकरीत्या आपले जनतेप्रति कर्तव्य बजावण्याचे काम येथून करीत असल्यामुळे विधिमंडळाला यथार्थापणे 'लोकशाहीचे मंदिर' असे संबोधले जाते. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान नागपूर या वैदर्भीय शहरास प्राप्त आहे. त्यामुळे सन १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारा़न्वये [१] महाराष्ट्र विधिमंडळाच्या उन्हाळी, पावसाळी व हिवाळी या तीन अधिवेशनांपैकी हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या इमारतीत आयोजित केले जाते. महाराष्ट्र विधिमंडळाबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण इंटरनेटवरील या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
तुम्ही काय करू शकता
हे दालन महाराष्ट्र शासन, त्याचे अनेक विभाग आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी तसेच निमसरकारी संस्थांबद्दलची माहिती पुरवते. यातील लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.
नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे आणि अधिक माहिती आणि मदतीकरिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.