बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.[२][३] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे. किशोरी पेडणेकर ह्या मुंबईच्या महापौर आहेत.

Brihanmumbai Municipal Corporation
बृहन्मुंबई महानगरपालिका
प्रकार
प्रकारमहानगरपालिका
इतिहास
नेते
महापौरकिशोरी पेडणेकर, शिवसेना
२०१७
उपमहापौरसुहास वाडकर, शिवसेना[१],
संरचना
सदस्य२२७
संयुक्त समिती
  शिवसेना: ९३ जागा
  भाजप: ८२ जागा
  काँग्रेस: ३१ जागा
  रा.काँग्रेस: ९ जागा
  मनसे: १ जागा
  सप: ६ जागा
  एमआयएम: २ जागा
  अपक्ष: ६ जागा
निवडणूक
मागील निवडणूक२०१७
बैठक ठिकाण
बृहन्मुंबई महानगरपालिका
संकेतस्थळ
https://portal.mcgm.gov.in/
तळटिपा
बोधवाक्य (संस्कृत: यतो धर्मस्ततो जय)
(सत्याचा विजय होवो)

प्रशासन

BMCचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतात जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, सहसा बहुसंख्य पक्षाचे, सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. जून 2008 पर्यंत, बीएमसीमधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला[४], त्यानंतर बीएमसीने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली[५].

शहराचे अधिकारी
महापौरकिशोरी पेडणेकर][६]२२ नोव्हेंबर २०१९
उपमहापौरसुहास वाडकर२२ नोव्हेंबर २०१९
महानगरपालिका आयुक्तइकबाल सिंह चहल[७]८ मे २०२०

महानगरपालिका विधिमंडळ

२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधीमंडळ असेही म्हणतात, त्यात 227 सदस्य होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 31 उमेदवारांनी एकाच प्रभागातून (164) निवडणूक लढवली होती. राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार होते[८].

नगरसेवक निवडणूक

२०१७ च्या निवडणुकीनंतरची सदस्य संख्या[९]

अ.क्र.पार्टीचे नावयुतीपार्टी चिन्ह२००७ निवडणुकात नगरसेवक२०१२ निवडणुकात नगरसेवक२०१७ निवडणुकात नगरसेवक
०१शिवसेना (SS)NDA ८४७५९३
०२भारतीय जनता पार्टी (भाजपा)NDA२८३१८२
०३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)UPA--५२३१
०४राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)UPA १३०९
०५महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)- ०७२८०१
०६समाजवादी पक्ष (SP)-०७०९०६
०७ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM)- --०२
०८अन्य---३२०६

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे