दिंडोशी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ - १५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, दिंडोशी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १५६४ चा समावेश होतो. दिंडोशी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे सुनिल वामन प्रभू हे दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९सुनील वामन प्रभूशिवसेना
२०१४सुनील वामन प्रभूशिवसेना
२००९राजहंस सिंह धनंजय सिंहभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल