दिया मिर्झा

एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री

दिया मिर्झा-हेंड्रिच ( ९ डिसेंबर १९८१) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. हैदराबाद येथे जन्मलेल्या दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. ह्याच वर्षी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड तर लारा दत्ताने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्या होत्या.

दिया मिर्झा
जन्मदिया मिर्झा-हेंड्रिच
९ डिसेंबर, १९८१ (1981-12-09) (वय: ४२)
हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रचित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ२००१ - आजपर्यंत
भाषाहिंदी
पती • 
साहिल संघा (ल. २०१४२०१९)
 • 
वैभव रेखी (ल. २०२१)
अधिकृत संकेतस्थळhttp://www.diamirza.com

२००१ साली दियाने रहना है तेरे दिल में ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत.

दिया मिर्झाचा पहिला विवाह तिचा व्यावसायिक भागीदार साहिल संघा सोबत ऑक्टोबर २०१४ मध्ये आर्य समाज पद्धतीने झाला.[१].

दिया मिर्झा आणि साहिल संघा

इ. स. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[२][३] आणि १५ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यावसायिक वैभव रेखी सोबत दिया मिर्झा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली[४][५][६]

संदर्भ

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दिया मिर्झा चे पान (इंग्लिश मजकूर)

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन