फर्डिनांड मेजेलन

फर्डिनांड मेजेलन (पोर्तुगीज: Fernão de Magalhães; स्पॅनिश: Fernando de Magallanes; १४८० ते २७ एप्रिल १५२१) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते. वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्समधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला.

फर्डिनांड मेजेलन
Fernão de Magalhães (पोर्तुगीज)
Fernando de Magallanes (स्पॅनिश)
जन्म१४८०
साब्रोझा, पोर्तुगाल
मृत्यू२७ एप्रिल १५२१
सेबू, फिलिपाईन्स
राष्ट्रीयत्वपोर्तुगीज
नागरिकत्वस्पॅनिश
प्रसिद्ध कामेसर्वप्रथम जगफेरी पूर्ण करणारा
स्वाक्षरी

मेजेलनची सामुद्रधुनी हे नाव मेजेलनवरूनच देण्यात आले आहे.


मेजेलनच्या नेतृत्वाखालील बोटींच्या ताफ्याने काटलेला मार्ग


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: