बिजू पटनायक विमानतळ

(बिजु पटनायक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBIआप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.

बिजू पटनायक विमानतळ
भुवनेश्वर विमानतळ
आहसंवि: BBIआप्रविको: VEBS
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाभुवनेश्वर
समुद्रसपाटीपासून उंची१३८ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक)20°14′40″N 085°49′04″E / 20.24444°N 85.81778°E / 20.24444; 85.81778
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०५/२३४,५२४१,३७९डांबरी धावपट्टी
१४/३२७,३५९२,२४३डांबरी धावपट्टी

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा

ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे.

या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात.

भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी)

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
इंडियन एअरलाइन्सचेन्नई, दिल्ली, मुंबई
इंडिगो एअरलाइन्सदिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद
जेटलाईटदिल्ली, कोलकाता
किंगफिशर एअरलाइन्सदिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन