बुद्ध (शीर्षक)

बौद्ध धर्मात पूर्णपणे आध्यात्मिकरित्या जागृत होण्याची स्थिती

बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण जाणीव आहे.[१] "बुद्ध" हा शब्द सर्वसाधारणपणे बौद्ध धर्माचे गुरू आणि संस्थापक सिद्धार्थ गौतम यांचा उल्लेख आहे, ज्यांना "गौतम बुद्ध" असेही म्हटले जाते. इतरांनी या शब्दाचा अर्थ काढला 'ज्याने ज्ञान (बोधी) आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, जसे गौतम, अमिताभ आणि भविष्यातील बुद्ध, मैत्रेय यांच्या पूर्वीचे २७ बुद्ध.

बुद्ध आपले पहिले प्रवचन देतानाचे चित्रण

बुद्ध हे व्यक्तीचे नाव अथवा पद नसून ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे. बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा सम्यक सम्बुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. पाली भाषेत याला सर्वज्ञ (अमर्यादित ज्ञानी) म्हटले आहे.[२]

व्युत्पत्ती

बुद्ध शब्द म्हणजे "पूर्ण जागृत" किंवा "प्रबुद्ध" व्यक्ती. चिनी बौद्ध परंपरेनुसार, हे शीर्षक "शाश्वत" म्हणून भाषांतरित केले आहे.[३] युगाच्या पहिल्या जागृतासाठी देखील "बुद्ध" हा शीर्षक म्हणून वापरला जातो. सर्व बौद्ध परंपरांमध्ये, सिद्धार्थ गौतम यांना सध्याच्या युगाचे 'सर्वोच्च बुद्ध' (पाली: सम्मासंबुद्ध, संस्कृत: सम्यकसंबुद्ध) म्हणून ओळखले जातात.

बुद्धवंसमध्ये गौतमासह २५ बुद्धांच्या नावाचा समावेश आहे.[४]

यादी

मुख्य लेख: नामांकित बुद्धांची यादी

हे सुद्धा पहा

संदर्भ