राष्ट्रीय लोकशाही आघाडी

भारतातील एक राजकीय पक्ष

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून व २०१९ लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधले सदस्य पक्ष

क्रमपक्षलोकसभेमधील विद्यमान सदस्यराज्यसभेमधील विद्यमान सदस्यप्रमुख राज्य
1भारतीय जनता पक्ष28042राष्ट्रीय पक्ष
2शिवसेना २०१९ पर्यंत! २०१९ पासून UPA184महाराष्ट्र
3तेलुगू देशम पक्ष166आंध्र प्रदेश, तेलंगण
4लोक जनशक्ती पार्टी60बिहार
5शिरोमणी अकाली दल43पंजाब
6राष्ट्रीय लोक समता पार्टी30बिहार
7अपना दल20उत्तर प्रदेश
8नागा पीपल्स फ्रंट11नागालॅंड
9नॅशनल पीपल्स पार्टी10मेघालय
10स्वाभिमानी पक्ष10महाराष्ट्र
11पी.एम.के.10तामिळनाडू
12अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस10पुडुचेरी
13मिझो नॅशनल फ्रंट00मिझोराम
14भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)01महाराष्ट्र
15राष्ट्रीय समाज पक्ष00महाराष्ट्र
16डी.एम.डी.के.00तामिळनाडू
17मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम00तामिळनाडू
18कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची00तामिळनाडू
19इंडिया जननायक कच्ची00तामिळनाडू
20न्यू जस्टिस पार्टी00तामिळनाडू
21जन सेना00आंध्र प्रदेश, तेलंगण
22गोरखा जनमुक्ती मोर्चा00पश्चिम बंगाल
23केरळ काँग्रेस (राष्ट्रवादी)00केरळ
24केरळ रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (बोल्शेविक)00केरळ
25महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष00गोवा
26गोवा विकास पार्टी00गोवा
27ईशान्य प्रादेशिक राजकीय आघाडी00ईशान्य भारत
28मणिपूर पीपल्स पक्ष00मणिपूर
29कामतापूर पीपल्स पार्टी00पश्चिम बंगाल
एकूण33457भारत

रालोआ पक्ष सत्तेवर असलेली राज्ये

क्रमराज्य/प्रदेशमुख्यमंत्रीपक्षकार्यकाळ आरंभविधानसभेमधील जागा
1छत्तीसगडरमण सिंगभारतीय जनता पक्ष7 डिसेंबर200349/90
2गोवामनोहर पर्रीकरभारतीय जनता पक्ष9 मार्च 201224/40
3गुजरातआनंदीबेन पटेलभारतीय जनता पक्ष22 May 2014115/182
4मध्य प्रदेशशिवराजसिंग चौहानभारतीय जनता पक्ष29 नोव्हेंबर 2005185/230
5राजस्थानवसुंधरा राजेभारतीय जनता पक्ष13 डिसेंबर2013163/200
6आंध्र प्रदेशएन. चंद्रबाबू नायडूतेलुगू देशम पक्ष2 जून 2014106/175
7नागालॅंडटी.आर. झेलियांगनागा पीपल्स फ्रंट24 मे 201438/60
8पुडुचेरीएन. रंगास्वामीअखिल भारतीय एन.आर. काँग्रेस16 मे 201115/30
9पंजाबप्रकाशसिंग बादलशिरोमणी अकाली दल1 मार्च 200768/117