मनोहर पर्रीकर

भारतीय राजकारणी
(मनोहर पर्रिकर, या पानावरून पुनर्निर्देशित)

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म : १३ डिसेंबर १९५५; - १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.

मनोहर पर्रीकर

कार्यकाळ
९ नोव्हेंबर २०१४ – १३ मार्च २०१७
पंतप्रधाननरेंद्र मोदी
मागीलअरुण जेटली
पुढीलनिर्मला सीतारमण

कार्यकाळ
१४ मार्च २०१७ – १७ मार्च २०१९
मागीललक्ष्मीकांत पार्सेकर
पुढीलडॉ. प्रमोद सावंत
मतदारसंघपणजी
कार्यकाळ
२ मार्च २०१२ – ८ नोव्हेंबर २०१४
मागीलदिगंबर कामत
पुढीललक्ष्मीकांत पार्सेकर
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर इ.स. २००० – २ फेब्रुवारी इ.स. २००५
मागीलफ्रान्सिस्को सार्डिन्हा
पुढीलप्रतापसिंह राणे

जन्म१३ डिसेंबर १९५५
म्हापसा, गोवा
मृत्यू१७ मार्च, २०१९ (वय ६३)[१]
गोवा
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष

त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत.

ते १९९४,१९९९,२००२,२००७ आणि २०१२च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले.

पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मृत्यू

मनोहर पर्रीकर १७ मार्च २०१९ रोजी निधन पावले.[२]

चरित्र

मनोहर पर्रीकर यांचे 'मनोहर कथा' नावाचे चरित्र मंगला खाडिलकर यांनी लिहिले आहे.

पर्रीकरांसंबंधी पुस्तके

  • गोवा राजकारण आणि पर्रीकर (सद्गुरू पाटील)

बाह्य दुवे

संदर्भ