मिसूरी

मिसूरी (इंग्लिश: Missouri; En-us-Missouri.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य भागात (मिड-वेस्ट) वसलेले मिसूरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १८व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मिसूरी
Missouri
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: -
ब्रीदवाक्य: Salus populi suprema lex esto (लॅटिन)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीजेफरसन सिटी
मोठे शहरकॅन्सस सिटी
सर्वात मोठे महानगरसेंट लुईस
क्षेत्रफळ अमेरिकेत २१वा क्रमांक
 - एकूण१,८०,५३३ किमी² 
  - रुंदी३८५ किमी 
  - लांबी४८० किमी 
 - % पाणी१.१७
लोकसंख्या अमेरिकेत १८वा क्रमांक
 - एकूण५९,८८,९२७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता३९.२/किमी² (अमेरिकेत ३०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $४६,८६७
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश१० ऑगस्ट १८२१ (२४वा क्रमांक)
संक्षेप  US-MO
संकेतस्थळwww.mo.gov

मिसूरीच्या दक्षिणेला आर्कान्सा, पश्चिमेला कॅन्सस, नैऋत्येला ओक्लाहोमा, वायव्येला नेब्रास्का, उत्तरेला आयोवा, पूर्वेला इलिनॉयकेंटकी तर आग्नेयेला टेनेसी ही राज्ये आहेत. जेफरसन सिटी ही मिसिसिपीची राजधानी, कॅन्सस सिटी हे सर्वात मोठे शहर तर सेंट लुईस हे येथील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. मिसूरी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी राज्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम दिशेने वाहते व सेंट लुईसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात वसलेले मिसूरी बरेचदा पूर्व व पश्चिम अमेरिकेला वेगळे करणारे राज्य मानले जाते. येथील सेंट लुईस शहर सर्वात पश्चिमेकडील पौव्रात्य शहर तर कॅन्सस सिटी शहर सर्वात पूर्वेकडील पश्चिमात्य शहर अशी संबोधली जातात.

शेती, खाद्य व्यवसाय, रासायनिक उत्पादन हे मिसूरीमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील वाईन बनवण्याचा उद्योग वेगाने प्रगती करीत आहे.


मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: