मॅगी स्मिथ

Maggie Smith (es); Maggie Smith (ms); Maggie Smith (en-gb); Маги Смит (bg); Maggie Smith (tr); میگی اسمتھ (ur); Maggie Smith (mg); Maggie Smithová (sk); Меггі Сміт (uk); 瑪姬·史密斯 (zh-hant); 玛吉·史密斯 (zh-cn); Maggie Smith (sc); Maggie Smith (uz); মেগী স্মিথ (as); Maggie Smith (eo); Maggie Smithová (cs); Maggie Smith (bs); Maggie Smith (an); ম্যাগি স্মিথ (bn); Maggie Smith (fr); Maggie Smith (hr); 玛姬·史密夫 (zh-my); मॅगी स्मिथ (mr); Maggie Smith (vi); Megija Smita (lv); Maggie Smith (af); Меги Смит (sr); Maggie Smith (pt-br); 玛吉·史密斯 (zh-sg); Maggie Smith (lb); Maggie Smith (nn); Maggie Smith (nb); Meggi Smit (az); ماگی سمیت (ckb); Maggie Smith (en); ماغي سميث (ar); Maggie Smith (br); Μάγκι Σμιθ (el); 瑪姬史密芙 (yue); Maggie Smith (hu); Maggie Smith (sq); Maggie Smith (nl); Maggie Smith (eu); 瑪姬·史密芙 (zh-hk); Maggie Smith (ast); Maggie Smith (ca); Maggie Smith (de-ch); Maggie Smith (cy); Maggie Smith (pms); Мэгі Сміт (be); مگی اسمیت (fa); 瑪姬·史密芙 (zh); Maggie Smith (da); მეგი სმითი (ka); マギー・スミス (ja); Megi Smit (sr-el); Maggie Smith (sv); ماجى سميث (arz); Маггие Смит (tg); מגי סמית' (he); Margarita Smith (la); Maggie Smith (sh); Maggie Smith (sco); 玛吉·史密斯 (wuu); ਮੈਗੀ ਸਮਿਥ (pa); Մակի Սմիթ (hyw); Maggie Smith (en-ca); Maggie Smith (ilo); Maggie Smit (tg-latn); Maggie Smith (it); Maggie Smith (id); Меги Смит (sr-ec); Мэгги Смит (ru); Maggie Smith (et); Maggie Smith (ga); Мэгги Смит (kk); மேகி ஸ்மித் (ta); Maggie Smith (fi); Maggie Smith (yo); Maggie Smith (oc); Maggie Smith (pt); Maggie Smith (vo); Maggie Smith (io); Меги Смит (mk); Maggie Smith (lt); Maggie Smith (sl); Maggie Smith (tl); Մեգի Սմիթ (hy); მეგი სმითი (xmf); แมกกี สมิธ (th); Maggie Smith (pl); മാഗി സ്മിത്ത് (ml); 瑪姬·史密斯 (zh-tw); Мәгги Смит (tt); Maggie Smith (war); Maggie Smith (de); Maggie Smith (ro); Maggie Smith (gl); 매기 스미스 (ko); 玛吉·史密斯 (zh-hans); مقی اسمیت (azb) actriz británica (es); angol színésznő (hu); actriz británica (ast); британская актриса (ru); actores (cy); брытанская актрыса (be); بازیگر بریتانیایی (fa); 英国演员 (zh); engelsk skuespiller (da); انگریز اداکارہ (ur); anglická herečka (sk); שחקנית קולנוע, טלוויזיה ותיאטרון בריטית (he); brittiläinen näyttelijä (fi); britská herečka (cs); ஆங்கிலேய நடிகை (ta); attrice britannica (1934-) (it); actrice britannique (fr); brittisk skådespelare (sv); English actress (en); 영국의 배우 (ko); nữ diễn viên người Anh (vi); イギリスの女優 (ja); angļu aktrise (lv); Britse aktrise (af); британска актриса (bg); britische Schauspielerin (de); atriz britânica (pt); британська теле-, кіно- і театральна акторка (uk); English actress (en-gb); brittesch Schauspillerin (lb); aktorka brytyjska (pl); ബ്രിട്ടനിലെ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); Brits actrice (nl); Ingles nga aktres (ilo); actriu anglesa (ca); ban-aisteoir Sasanach (ga); ئەکتەری ئینگلیزی (لەدایکبووی ١٩٣٤) (ckb); English actress (en); ممثلة إنجليزية (ar); Αγγλίδα ηθοποιός (el); engleska glumica (bs) Margaret Natalie Smith (es); Margaret Natalie Smith Cross, Dame Maggie Smith, Dame Margaret Natalie Smith (hu); Margaret Natalie Smith (eu); Margaret Natalie Smith Cross (ast); Мегги Смит, Смит М., Смит Мэгги, Смит, Мэгги (ru); Margaret Natalie Smith Cross (de); Dame Margaret Natalie Smith (sq); 玛琪·史密斯, 瑪姬·史密斯, 玛吉·史密斯, Maggie Smith (zh); Dame Margaret Natalie Smith (da); Dame Maggie Smith, Dame Margaret Natalie Smith (tr); Margaret Natalie Smithová, Maggie Smith (sk); Мегі Сміт (uk); Maggie Smith (la); Margaret Natalie Smith, Maggie Smith (cs); Margaret Natalie Smith (bs); Margaret Natalie Smith (an); Dame Maggie Smith (fr); Margaret Natalie Smith (et); 玛吉·史密斯 (zh-my); Dama Margaret Natalie Smit (pt); Margaret Natalie Smith (ilo); Маги Смит, Maggie Smith (sr); Smith Maggie, Dame Margaret Natalie Smith (id); Margaret Natalie Smith (pl); Dame Maggie Smith, Dame Margaret Natalie Smith (ms); Megi Smit, Magi Smit (sh); מגי סמית (he); Margaret Natalie Smith Cross (it); Smith (sv); Dame Maggie Smith, Dame Margaret Natalie Smith, Margaret Natalie Smith, Dame Maggie Natalie Smith (en); Margaret Natalie Smith (gl); Margaret Natalie Smith Cross, Margaret Natalie Smith, Dame Margaret Natalie Cross Smith (ca); Dame Maggie Smith, Margaret Natalie Smith (ro); Margaret Natalie Smith, Dame Maggie Smith (af)

डेम मार्गारेट नॅटली स्मिथ[१] [२] (जन्म २८ डिसेंबर १९३४) एक इंग्रजी अभिनेत्री आहे जी मॅगी स्मिथ म्हणून ओळखली जाते. विनोदी भूमिकांमध्ये तिच्या थट्टेखोर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने सात दशकांहून अधिक काळ रंगमंचावर आणि पडद्यावर विस्तृत कारकीर्द केली आहे. ती ब्रिटनमधील सर्वात ओळखण्यायोग्य आणि विपुल अभिनेत्रींपैकी एक आहे.[३] तिला दोन अकादमी पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार, चार एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक इतर पुरस्कार मिळाले आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे.

मॅगी स्मिथ 
English actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर २८, इ.स. १९३४
Ilford
Margaret Natalie Smith
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५२
नागरिकत्व
निवासस्थान
  • Pulborough
शिक्षण घेतलेली संस्था
  • Oxford High School
व्यवसाय
मातृभाषा
  • British English
अपत्य
  • Toby Stephens
  • Chris Larkin
वैवाहिक जोडीदार
  • Robert Stephens (इ.स. १९६७ – इ.स. १९७५)
  • Alan Beverley Cross (इ.स. १९७५ – इ.स. १९९८)
कर्मस्थळ
पुरस्कार
  • Society of London Theatre Special Award (इ.स. २०१०)
  • Academy Award for Best Actress (इ.स. १९७०)
  • Dame Commander of the Order of the British Empire (इ.स. १९९०)
  • Academy Award for Best Supporting Actress (इ.स. १९७९)
  • Academy Fellowship Award (इ.स. १९९६)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९७०)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९८५)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९८७)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९८९)
  • BAFTA Award for Best Actress in a Supporting Role (इ.स. २०००)
  • Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २०११)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २००३)
  • Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actress in a Drama Series (इ.स. २०१२)
  • Golden Globe Award for Best Actress in a Motion Picture – Musical or Comedy (इ.स. १९७९)
  • Golden Globe Award for Best Supporting Actress – Motion Picture (इ.स. १९८७)
  • Golden Globe Award for Best Supporting Actress – Series, Miniseries or Television Film (इ.स. २०१३)
  • Tony Award for Best Actress in a Play (इ.स. १९९०)
  • honorary doctor of the University of St Andrews
  • Companion of Honour
  • Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actress in a Drama Series (इ.स. २०१६)
  • Critics' Circle Award for Distinguished Service to the Arts
  • Evening Standard Theatre Award for Best Actress
  • Bodley Medal (इ.स. २०१६)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q172653
आयएसएनआय ओळखण: 0000000109631675
व्हीआयएएफ ओळखण: 32184778
जीएनडी ओळखण: 172378516
एलसीसीएन ओळखण: nr88003842
बीएनएफ ओळखण: 13899874r
एसयूडीओसी ओळखण: 059055146
आय.एम.डी.बी. दुवा: nm0001749
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35468848
एमबीए ओळखण: 13be31c3-148b-4590-ab41-c1f60f20479b
एनकेसी ओळखण: xx0005605
बीएनई ओळखण: XX1538958
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 073157910
बीआयबीएसआयएस ओळखण: 1012775
NUKAT ID: n2009094222
Internet Broadway Database person ID: 60421
NLP ID (old): a0000003092894
National Library of Korea ID: KAC2020K7317
Playbill person ID: maggie-smith-vault-0000066955
PLWABN ID: 9810668278705606
National Library of Israel J9U ID: 987007437690805171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्मिथने १९५२ मध्ये ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये काम करून विद्यार्थी म्हणून तिच्या नाटकाच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९५६ मध्ये ब्रॉडवेवर व्यावसायिक पदार्पण केले. पुढील दशकांमध्ये, स्मिथने नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीसाठी काम करत, जुडी डेंचसोबत सर्वात लक्षणीय ब्रिटिश थिएटर कलाकार म्हणून स्वतःची स्थापना केली. ब्रॉडवेवर, तिला नोएल कॉवर्डच्या प्रायव्हेट लाइव्ह्स (१९७५) आणि डेव्हिड हेअरच्या नाईट अँड डे (१९७९) साठी टोनी पुरस्कार नामांकन मिळाले आणि लेटीस अँड लोव्हेज (१९९०) च्या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला.

स्मिथने १९५८ मध्ये नोव्हेअर टू गो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३] १९६९ मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडीच्या शीर्षक भूमिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देण्यात आला आणि तिने कॅलिफोर्निया सूट (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देखील जिंकला.[४][५] ऑथेलो (१९६५), ट्रॅव्हल्स विथ माय आंट (१९७२), ए रूम विथ अ व्यू (१९८५), आणि गॉस्फोर्ड पार्क (२००१) मधील तिच्या भूमिकांसाठी तिची इतर ऑस्कर नामांकनं होती.[६] इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डेथ ऑन द नाईल (१९७८), हुक (१९९१), सिस्टर ऍक्ट (१९९२), [७] द सीक्रेट गार्डन (१९९३), हॅरी पॉटर सीरीज (२००१-२०११), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२) आणि द लेडी इन द व्हॅन (२०१५) यांचा समावेश होतो.

स्मिथ तिच्या संपूर्ण कारकिर्दीत टेलिव्हिजनवर तुरळकपणे दिसली आहे आणि ब्रिटीश एतिहासीक काळातील डाउन्टन ॲबी (२०१०-२०१५) मधील तिच्या व्हायोलेट क्रॉलीच्या भूमिकेसाठी तिने प्रेक्षकांचे खास लक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. या भूमिकेमुळे तिला तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. यापूर्वी माय हाऊस इन उम्ब्रिया (२००३) या एचबीओच्या चित्रपटासाठी पण तिने हा पुरस्कार जिंकला होता.[८][९]

तिच्या कारकिर्दीत, स्मिथला १९९३ मध्ये ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट फेलोशिप, १९९६ मध्ये बाफ्टा फेलोशिप आणि २०१० मध्ये सोसायटी ऑफ लंडन थिएटर स्पेशल अवॉर्ड यासह असंख्य मानद पुरस्कारांनी मान्यता मिळाली आहे.[१०][११][६] स्मिथला १९९० मध्ये राणी दुसरी एलिझाबेथने तिच्या कलेतील योगदानासाठी डेम पद दिले,[१२] आणि नाटकातील सेवांसाठी २०१४ मध्ये ऑर्डर ऑफ द कंपेनियन्स ऑफ ऑनरचे सदस्यपद दिले.

वैयक्तिक जीवन

मार्गारेट स्मिथ यांचा जन्म २८ डिसेंबर १९३४ रोजी इलफोर्ड, एसेक्स येथे झाला.[१३][१४] [१५][१६] तिची आई, मार्गारेट हटन (१८९६-१९७७), ग्लासगो येथील स्कॉटिश सचिव होत्या आणि तिचे वडील, नॅथॅनियल स्मिथ (१९०२-१९९१), न्यूकॅसल अपॉन टाईने येथील सार्वजनिक-आरोग्य पॅथॉलॉजिस्ट होते, ज्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात काम केले.[१४][१७][१८] तिला मोठे जुळे भाऊ होते; ॲलिस्टर (मृत्यू १९८१) आणि इयान. इयान ने आर्किटेक्चर शाळेत प्रवेश घेतला. स्मिथचे शिक्षण वयाच्या सोळा वर्षां पर्यंत ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये झाले, व नंतर ती ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये अभिनय शिकण्यासाठी गेली.[१९]

स्मिथने २९ जून १९६७ रोजी अभिनेता रॉबर्ट स्टीफन्सशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे, अभिनेता ख्रिस लार्किन (जन्म. १९६७) आणि टोबी स्टीफन्स (जन्म. १९६९) होते. [२०] ६ एप्रिल १९७५ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१] स्मिथने २३ जून १९७५ रोजी गिल्डफोर्ड रजिस्टर ऑफिसमध्ये नाटककार ॲलन बेव्हरली क्रॉसशी लग्न केले, [२१] आणि २० मार्च १९९८ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचे लग्न राहिले.[२२] स्मिथला पाच नातवंडे आहेत.[२३][२४][२५]

२००७ मध्ये, द संडे टेलिग्राफने खुलासा केला की स्मिथला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. २००९ मध्ये, ती पूर्ण बरी झाल्याची नोंद झाली.[२६]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन