मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार

मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार २३ ऑगस्ट, इ.स. १९३९च्या रात्री मॉस्को येथे जर्मनी आणि सोवियेत संघात झालेला ना-युद्ध करार होता..[१] जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री जोकिम फोन रिबेनट्रॉप यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या या कराराचे अधिकृत नाव जर्मनी आणि सोवियेत संघातील ना-युद्ध करार असे होते.[२] या कराराद्वारे सोवियेत संघ आणि जर्मनीने एकमेकांवर चढाई न करण्याचे आश्वासन तर दिलेच होते शिवाय इतर राष्ट्रांनी यांपैकी एकावर हल्ला केला असता त्यात मध्ये दखल न देण्याचेही कलम होते.

या करारात त्यावेळी जाहीर न करण्यात आलेल्या कलमांत उत्तर आणि पूर्व युरोपमधील देश आणि प्रदेशांचे आपसांत वाटप सुद्धा करून घेण्यात आलेले होते. त्यानुसार त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस पोलंडवर चढाई करून त्याचे दोन तुकडे करून बळकावले तर सोवियेत संघाने पूर्व फिनलंड मधील कारेलिया प्रदेश काबीज केले आणि एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, बेसारेबिया, बुकोव्हिना आणि हेर्त्झा हे देश व प्रदेश खालसा केले. या दरम्यान जर्मनीने या कराराचा आधार घेउन बघ्याचीच भूमिका घेतली.

जून २२, इ.स. १९४१ रोजी जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा या मोहीमेंतर्गत सोवियेत संघावर आक्रमण करताच हा करार संपुष्टात आला.

संदर्भ आणि नोंदी