मॉस्को

रशिया देशाची राजधानी


मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.

मॉस्को
Москва
रशिया देशाची राजधानी

मॉस्को
ध्वज
चिन्ह
मॉस्को is located in रशिया
मॉस्को
मॉस्को
मॉस्कोचे रशियामधील स्थान

गुणक: 55°45′N 37°37′E / 55.750°N 37.617°E / 55.750; 37.617

देश रशिया ध्वज रशिया
स्थापना वर्ष इ.स. ११४७
महापौर सर्जिये सोब्यानिन
क्षेत्रफळ २,५११ चौ. किमी (९७० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१५,०३,५०१
  - घनता ४,५८१.२४ /चौ. किमी (११,८६५.४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
अधिकृत संकेतस्थळ

राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.

इतिहास

भूगोल

मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे.

हवामान

जनसांख्यिकी

प्रशासन

अर्थव्यवस्था

संस्कृती

खेळ

मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच यु‌एफा चॅंपियन्स लीगच्या २००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल.

रशियन प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये मॉस्को महानगरामधील पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, एफ.सी. डायनॅमो मॉस्को, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्कोएफ.सी. स्पार्ताक मॉस्को हे चार क्लब खेळतात.

वाहतूक

मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणाऱ्या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणाऱ्या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. तसेच मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वे ही रशियामधील सर्वात जुनी रेल्वे येथूनच सुरू होते. मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानकलेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक ही मॉस्कोमधील प्रमुख स्थानके आहेत.

हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत.

जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत मॉस्कोचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

[ संदर्भ हवा ] https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India

संदर्भ

17.</https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India>[१]

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: