योगिराज बागुल

(योगीराज बागूल या पानावरून पुनर्निर्देशित)

योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करून आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ]

योगीराज बागूल
जन्म नावयोगीराज पुंजाबा बागूल
जन्म१ जून, १९६६ (1966-06-01) (वय: ५७)
खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद (महाराष्ट्र)
शिक्षणबी कॉम, एम ए (समाजशास्त्र)
राष्ट्रीयत्वभारतभारतीय
धर्ममानव
कार्यक्षेत्रनोकरी, साहित्यनिर्मिती व समाजकार्य
भाषामराठी
साहित्य प्रकारसंशोधनात्मक, ललित, काव्य, चरित्र आणि आत्मचरित्र
विषयसामाजिक
चळवळमराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती आंदोलन.
प्रभावडॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागूल आणि पु.ल.देशपांडे, प्र.के. अत्रे
प्रभावितबहिणाबाई चौधरी, डॉ गंगाधर पानतावणे आणि प्रा.प्र.ई.सोनकांबळे
वडीलपुंजाबा गुजाजी बागूल
आईपार्वतीबाई
पत्नीललिता
अपत्येडॉ.निकिता, निलेश (इंजि.)
पुरस्कार • महाराष्ट्र शासन (२), कोमसाप(२),  • आशीर्वाद पुरस्कार (२),  • कवी अनंत फंदी पुरस्कार-संगमनेर,  • प्रसाद बन वैद्यकिय प्रतिष्ठाण पुरस्कार-नांदेड,  • रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार-कोपरगाव,  • प्रज्ञा पुरस्कार-नांदेड,  • एकता कल्चर पुरस्कार-मुंबई,  • आपटे वाचन मंदिर पुरस्कार-इचलकरंजी,  • चंद्रकुमार नलगे पुरस्कार-उजळईवाडी,  • गुणवंत कामगार पुरस्कार-म.रा. • उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्य निर्मितीसाठी सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचा 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार'

योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी खंडाळा (या.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथील जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील नागसेन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले.[ संदर्भ हवा ] साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनभिज्ञ पैलू आणि त्यांचे अजूनही माहित नसलेले कार्य शोधणे हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला (आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, कविता आणि संपादन) स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.[ संदर्भ हवा ]

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे उप व्यवस्थापक पदावर नोकरी करीत आहेत.[ संदर्भ हवा ]

भूषवित असलेली पदे[ संदर्भ हवा ]

  • अजीव सभासद - मुंबई मराठी साहित्य परिषद
  • अजीव सभासद - कोकण मराठी साहित्य परिषद,
  • सदस्य - डाँ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.
  • सदस्य - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंतर्गत सजावट समिती, ऐरोली, नवी मुंबई महानगरपालिका.
  • सदस्य - स्मृतिशेष घनःशाम तळवटकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, मुंबई.
  • सदस्य - ग्रंथ निवड आणि खरेदी समिती; डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), स्वायत्त संस्था, महाराष्ट्र शासन, पूणे.
  • सल्लागार - प्र.ई. सोनकांबळे प्रतिष्ठान, औरंगाबाद.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (बार्टी), पूढे या संस्थेच्या संशोधन परिषदेवर सदस्य म्हणून निवड.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कल्याण (पू) अंतर्गत सजावट अभ्यासक समितीत सदस्य

साहित्यनिर्मिती

बागूल यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी -[१]

  • प्रिय रामू, माता रमाबाई आंबेडकर यांचे चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)[२]
  • सोयरिक (काव्यसंग्रह-मृदगंधा प्रकाशन,भोसरी,पुणे)
  • ही वाट सुनसान कशी? काव्यसंग्रह (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • पाचट आत्मचरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१ वैचारिक (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • आठवणीतले बाबासाहेब,व्यक्तिचित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स (इंग्रजी-अनोखी प्रकाशन)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी सहकारी भाग-2 वैचारिक,(पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • 'यादें बाबासाहेब की' (हिंदी भाषेत) सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली.
  • 'दळण दळीत्ये' (आईच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन-पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • 'दगडी वाडा' ग्रामीण मराठी कादंबरी (पेरणी प्रकाशन -नवी मुंबई)
  • 'धूमसता धुमकेतू' महाकवी वामनदादा कर्डक यांचे जीवनचरित्र (पेरणी प्रकाशन -नवी मुंबई)

[३]

समाजभान

महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याणें.[ संदर्भ हवा ]

सह्याद्रि दूरदर्शन, एबीपी आणि साम टव्हिसह अनेक चैनल्सवर वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती.[ संदर्भ हवा ]

स्फुट लिखाण[ संदर्भ हवा ]

  • आरसपाणी (जेष्ठ लेखक वामन होवाळ यांचा अमृतमहोत्सवी अंक)- लेख
  • आठवींतले डाँ.गंगाधर पानतावणे-संपादक वैभव काळखैर (परिवर्तण प्रकाशन) - लेख
  • महामानव - संपादन अँड. विश्वास कश्यप - लेख
  • आंबेडकरी चळवळीचा शिलेदार अमृतमहोत्सवी गौरवांक) मलपृष्ठी मचकूर श्री. देवचंद अंबादे

आगामी[ संदर्भ हवा ]

  • मी बला (जीवनचरित्र एका नशिबवान शापितेचे)
  • डाॅ.आंबेडकरांच्या चळवळीतील तत्कालीन महिलांचे योगदान (खंड-१)
  • सावज - ग्रामीण मराठी कादंबरी
  • डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी (भाग-३)

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन