विधानसभा

राज्यातील कायदे मंडळाचा कनिष्ठ गृह

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार), आंध्र प्रदेशतेलंगणा या ६ घटकराज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व घटकराज्यांत एकगृह कायदेमंडळ पद्धती असून तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. भारतातील विधानसभा हे भारतीय लोकसभा सारखेच काम करणार असे घटनाकारांचे मत होते.घटनेच्या170 व्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत. विधानसभेच्या मतदारसंघांपैकी काही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असतात. उदा. महाराष्ट्रात 47 जागा राखीव आहेत. विधानसभेचा मतदारसंघ कमीत कमी 75000 ते 350000 मतदारांचा मिळून बनलेला असतो.विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कायद्यात पात्रता निश्चत केलेल्या आहेत.

वर्तमान राज्य विधानसभा

विधानसभाठिकाणसभासद[१]सत्ताधारी पक्षवर्तमान सत्र
आंध्र प्रदेश विधानसभाअमरावती१७५वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष१५ वी
अरुणाचल प्रदेश विधानसभाइटानगर६०भारतीय जनता पक्ष१० वी
आसाम विधानसभादिसपूर१२६भारतीय जनता पक्ष१५ वी
बिहार विधानसभापाटणा२४३जनता दल (संयुक्त)१७ वी
छत्तीसगढ विधानसभारायपूर९०भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१५ वी
दिल्ली विधानसभानवी दिल्ली७०आम आदमी पार्टी१७ वी
गोवा विधानसभापणजी४०भारतीय जनता पक्ष८ वी
गुजरात विधानसभागांधीनगर१८२भारतीय जनता पक्ष१५ वी
हरियाणा विधानसभाचंदिगढ९०भारतीय जनता पक्ष१४ वी
हिमाचल प्रदेश विधानसभाशिमला (उ.)
धर्मशाळा (हि.)
६८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४ वी
जम्मू आणि काश्मीर विधानसभाश्रीनगर (उ.)
जम्मू (हि.)
९०(राष्ट्रपती राजवट)
झारखंड विधानसभारांची८१झारखंड मुक्ति मोर्चा१५ वी
कर्नाटक विधानसभाबंगळूर (उ.)
बेळगांव (हि.)
२२४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१६ वी
केरळ विधानसभातिरुवनंतपुरम१४०भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)१५ वी
मध्य प्रदेश विधानसभाभोपाळ२३०भारतीय जनता पक्ष१५ वी
महाराष्ट्र विधानसभामुंबई (उ.)

नागपूर (हि.)
२८८शिवसेना१४ वी
मणिपूर विधानसभाइंफाळ६०भारतीय जनता पक्ष१२ वी
मेघालय विधानसभाशिलाँग६०नॅशनल पीपल्स पार्टी११ वी
मिझोरम विधानसभाऐझॉल४०मिझो नॅशनल फ्रंट८ वी
नागालँड विधानसभाकोहिमा६०नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी१४ वी
ओडिशा विधानसभाभुवनेश्वर१४७बिजू जनता दल१६ वी
पुडुचेरी विधानसभापुडुचेरी३०अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस१५ वी
पंजाब विधानसभाचंदिगढ११७आम आदमी पार्टी१६ वी
राजस्थान विधानसभाजयपूर२००भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१५ वी
सिक्कीम विधानसभागंगटोक३२सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा१० वी
तमिळनाडू विधानसभाचेन्नई२३४द्रविड मुन्नेत्र कळघम१६ वी
तेलंगणा विधानसभाहैदराबाद११९भारत राष्ट्र समिती२ री
त्रिपुरा विधानसभाआगरताळा६०भारतीय जनता पक्ष१३ वी
उत्तर प्रदेश विधानसभालखनौ४०३भारतीय जनता पक्ष१८ वी
उत्तराखंड विधानसभाBhararisain (उ.)

देहरादून (हि.)
७०भारतीय जनता पक्ष५ वी
पश्चिम बंगाल विधानसभाकोलकाता२९४अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१७ वी
एकूण४१२३

संदर्भ