संयोगभूमी

संयोगभूमी[१][श १] म्हणजे दोन विशाल भूखंडांना जोडणारा व दोन बाजूंना समुद्र किंवा अन्य जलाशय असलेला जमिनीचा चिंचोळा पट्टा होय. आशिया खंडातील अरबी द्वीपकल्पआफ्रिका यांना जोडणारी सुएझ संयोगभूमी, उत्तर व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी पनामा संयोगभूमी, मलय द्वीपकल्पाला उर्वरित आग्नेय आशियाशी जोडणारी क्रा संयोगभूमी या जगातील महत्त्वाच्या संयोगभूमी आहेत.

ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतातील उत्तर व दक्षिण ब्रूनी बेटांना जोडणारी संयोगभूमी

पारिभाषिक शब्दसूची

संदर्भ