आफ्रिका

खंड

आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.

आफ्रिका
आफ्रिका
आफ्रिका
क्षेत्रफळ३,०२,२१,५३२ वर्ग किमी
लोकसंख्या१०० कोटी
स्वतंत्र देश५६
संस्थाने व प्रांत

आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंद महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहेत. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रूपात त्यांची सुरुवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला आफ्रिका हा खंड आहे. आफ्रिकेत विविध भौगोलिक प्रदेश दिसून येतात. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

नाम व्युत्पत्ती

फोनेशियन ही भूमध्यसमुद्राच्या सभोवतालच्या प्रदेशात बोलली गेलेली एक प्राचीन भाषा आहे. या भाषेतील अफार (धूळ) हा शब्द आफ्रिका शब्दाच्या जवळ जाणारा आहे. उत्तर आफ्रिकेत कमी पर्जन्यमानामुळे अनेक प्रदेशात धुळीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आजही दिसते. त्याचप्रमाणे एप्रिका (खूप सूर्यप्रकाश असलेला) या लॅटिन शब्दातही या शब्दाचे मूळ शोधले जाते. याखेरीज इतरही अनेक शब्दांमध्ये आफ्रिका शब्दाचे नामसाधर्म्य दिसून येते.

इतिहास

सरीसृपांचे युग अशी ओळख असलेल्या मेसोझोईक काळात म्हणजे सुमारे २५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आफ्रिकेत अवाढव्य आकाराच्या प्राण्यांचे अस्तित्व होते. डायनोसॉरचे जीवसृष्टीत प्राबल्य असलेला ज्युरासिक कालखंड याच युगाचा एक भाग होता. त्या काळातील प्राण्यांचे अवशेष आफ्रिकेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशामध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.[१]

आफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आफ्रिकेचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असे म्हटले जाते. आदिमानवाचा अर्थात होमो इरेक्टसच्या जीवनाचाही प्रारंभ १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतूनच झाला असे संशोधक मानतात. त्यानंतर आजच्या आधुनिक माणसाचा अर्थात होमो सपायन्सच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी याच खंडात झाला. येथून पुढच्या काळात उत्तरेला युरोप आणि पूर्वेला आशिया खंडात मानवी वस्ती विस्तारत गेली.

लिखित इतिहासानुसार, इजिप्तमध्ये इसवी सनापूर्वी ३३०० वर्षे आधीच्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. युरोपीयंच्या आफ्रिकेतील मोहिमांचा प्रारंभ ग्रीकांपासून झाला. अलेक्झांडर द ग्रेट याने इजिप्तचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. त्याने अलेक्झांड्रिया शहर ही वसवले.

इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अरबस्थानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माचा प्रभाव इजिप्तपर्यंत आणि नंतर आफ्रिकेत दक्षिण बाजूला विस्तारत गेला. त्याने आफ्रिकेत नव्याच संस्कृतीची भर घातली. नवव्या शतकापासून युरोपीयांनी आफ्रिकेत जम बसवला.

गुलामगिरीच्या अमानवी प्रथेला आफ्रिकेत मोठा इतिहास आहे. खंडाच्या पूर्व भागात, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरुवातीपासून अरबांचा गुलाम व्यापार (अरब स्लाव्ह ट्रेड) चालत होता. सोळाव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून अटलांटिक स्लाव्ह ट्रेड चालला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरू केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रिया इ.स. १९५३ मध्ये लिबियापासून सुरू झाली. इ.स. १९९३ पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.

अर्थव्यवस्था

आफ्रिका खंड जगात सर्वाधिक निर्धन आणि अविकसित राहिला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आजारांच्या साथी आणि विषाणूंचा फैलाव, मानवी हक्कांचे उल्लंघन, लाचखोर सरकारे, मध्यवर्ती नियोजनाचा अभाव, निरक्षरता, परदेशी भांडवलापर्यंत मर्यादितच पोहोच, जमाती-जमातींत किंवा लष्करांमधील संघर्ष ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत.

आफ्रिकेतील देश

आफ्रिका खंडात पुढील देशांचा समावेश होतो

आफ्रिकेतील प्रदेश व देशक्षेत्रफळ
(चौरसग किमी)
लोकसंख्या
(१ जुलै २००२ रोजी)
लोकसंख्या घनता
(प्रति चौरस किमी)
राजधानी
पूर्व आफ्रिका:
 बुरुंडी27,8306,373,002229.0बुजुंबुरा
 कोमोरोस2,170614,382283.1मोरोनी
 जिबूती23,000472,81020.6जिबूती
 इरिट्रिया121,3204,465,65136.8अस्मारा
 इथियोपिया1,127,12767,673,03160.0अदिस अबाबा
 केन्या582,65031,138,73553.4नैरोबी
 मादागास्कर587,04016,473,47728.1अंतानानारिव्हो
 मलावी118,48010,701,82490.3लिलॉंग्वे
 मॉरिशस2,0401,200,206588.3पोर्ट लुईस
 मायोत374170,879456.9मामौझू
 मोझांबिक801,59019,607,51924.5मापुतो
 रेयूनियों2,512743,981296.2सेंट डेनिस
 र्‍वांडा26,3387,398,074280.9किगाली
 सेशेल्स45580,098176.0व्हिक्टोरिया
 सोमालिया637,6577,753,31012.2मोगादिशु
 टांझानिया945,08737,187,93939.3डोडोमा
 युगांडा236,04024,699,073104.6कंपाला
 झांबिया752,6149,959,03713.2लुसाका
 झिंबाब्वे390,58011,376,67629.1हरारे
मध्य आफ्रिका:
 अँगोला1,246,70010,593,1718.5लुआंडा
 कामेरून475,44016,184,74834.0याऊंदे
 मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक622,9843,642,7395.8बांगुई
 चाड1,284,0008,997,2377.0न्द्जामेना
 काँगो342,0002,958,4488.7ब्राझाव्हिल
 काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक2,345,41055,225,47823.5किंशासा
 इक्वेटोरीयल गिनी28,051498,14417.8मलाबो
 गॅबन267,6671,233,3534.6लिब्रेव्हिल
 साओ टोमे व प्रिन्सिप1,001170,372170.2साओ टोमे
उत्तर आफ्रिका:
 अल्जेरिया2,381,74032,277,94213.6अल्जीयर्स
इजिप्त [२]1,001,45070,712,34570.6कैरो
 लिबिया1,759,5405,368,5853.1त्रिपोली
 मोरोक्को446,55031,167,78369.8रबात
 सुदान2,505,81037,090,29814.8खार्टूम
 ट्युनिसिया163,6109,815,64460.0ट्युनिस
पश्चिम सहारा [३]266,000256,1771.0एल आयुन
उत्तर अफ्रिकेतील स्पॅनिश व पोर्तुगीज प्रदेश:
कॅनरी द्वीपसमूह (स्पेन)[४]7,4921,694,477226.2लास पामास दे ग्रॅन कॅनरिया,
सांता क्रूझ दे तेनेराईफ
सेउता (स्पेन)[५]2071,5053,575.2
मादेईरा (पोर्तुगाल)[६]797245,000307.4फुंकल
मेलिया [७]1266,4115,534.2
दक्षिण आफ्रिका:
 बोत्स्वाना600,3701,591,2322.7गॅबोरोन
 लेसोठो30,3552,207,95472.7मासेरू
 नामिबिया825,4181,820,9162.2विंडह्योक
 दक्षिण आफ्रिका1,219,91243,647,65835.8ब्लोएमफॉंटेन, केप टाउन, प्रिटोरिया[८]
 स्वाझिलँड17,3631,123,60564.7एमबाबने
पश्चिम आफ्रिका:
 बेनिन112,6206,787,62560.3पोर्तो-नोव्हो
 बर्किना फासो274,20012,603,18546.0Ouagadougou
 केप व्हर्दे4,033408,760101.4Praia
 कोत द'ईवोआर322,46016,804,78452.1आबिजान, यामुसुक्रो[९]
 गांबिया11,3001,455,842128.8बंजुल
 घाना239,46020,244,15484.5आक्रा
 गिनी245,8577,775,06531.6कोनाक्री
 गिनी-बिसाउ36,1201,345,47937.3बिसाउ
 लायबेरिया111,3703,288,19829.5मोन्रोविया
 माली1,240,00011,340,4809.1बामाको
 मॉरिटानिया1,030,7002,828,8582.7नौक्कॉट
 नायजर1,267,00010,639,7448.4नियामे
 नायजेरिया923,768129,934,911140.7अबुजा
सेंट हेलेना (ब्रिटन)4107,31717.8जेम्सटाऊन
 सेनेगल196,19010,589,57154.0डाकर
 सिएरा लिओन71,7405,614,74378.3फ्रीटाउन
 टोगो56,7855,285,50193.1लोम
Total30,368,609843,705,14327.8

आफ्रिकेवरील मराठी पुस्तके

संदर्भ