सिग्नल इडूना पार्क

सिग्नल इडूना पार्क (जर्मन: Signal Iduna Park) किंवा वेस्टफालेनस्टेडियॉन जर्मनी देशाच्या डॉर्टमुंड शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. सिग्नल इडूना नावाच्या विमा कंपनीने ह्या स्टेडियमचे प्रायोजन केल्यामुळे हे नाव दिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ६५,७१८ इतकी प्रेक्षक क्षमता असलेले सिग्नल इडूना पार्क हे जर्मनीतील सर्वात मोठे व युरोपमधील सर्वात प्रसिद्ध स्टेडियम्सपैकी एक आहे.

वेस्टफालेनस्टेडियॉन
Westfalenstadion
पूर्ण नावसिग्नल इडूना पार्क
स्थानडॉर्टमुंड, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन२ एप्रिल, इ.स. १९७४
पुनर्बांधणी१९९२, १९९९, २००३, २००६
बांधकाम खर्च२० कोटी युरो
आसन क्षमता५१,५००
संकेतस्थळसंकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
बोरूस्सिया डोर्टमुंड

१९७४२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून बोरूस्सिया डोर्टमुंड हा फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळतो.

२००६ फिफा विश्वचषक

तारीखवेळसंघ #१निकालसंघ #२फेरीप्रेक्षक
१० जून २००६18.00  त्रिनिदाद आणि टोबॅगो0–0  स्वीडनगट ब62,959
१४ जून २००६21.00  जर्मनी1–0  पोलंडगट अ65,000
१९ जून २००६15.00  टोगो0–2  स्वित्झर्लंडगट ग65,000
२२ जून २००६21.00  जपान1–4  ब्राझीलगट फ65,000
२७ जून २००६17.00  ब्राझील3–0  घानाउप-उपांत्यपूर्व फेरी65,000
४ जुलै २००६21.00  जर्मनी0–2  इटलीउपांत्यफेरी65,000
सिग्नल इडूना पार्कचे विस्तृत चित्र

बाह्य दुवे