अत्याग्रही विकार

छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार (OCD) हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोकांना पुनःपुन्हा गोष्टी तपासण्याची गरज वाटते, विशिष्ट नित्यक्रम पुनःपुन्हा करणे (ज्याला “विधी” असे म्हणतात), किंवा विशिष्ट विचार पुनःपुन्हा करणे (ज्याला “छंदिष्ट” असे म्हणतात).[१] थोड्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी लोक एकतर विचार किंवा क्रियांवर नियंत्रण ठेवण्यात अक्षम असतात.[१] सामान्य क्रियांमध्ये हात धुणे, वस्तूंची मोजणे, आणि दार बंद आहे का हे पाहण्यासाठी तपासणे यांचा समावेश होतो.[१] काहींना वस्तू बाहेर फेकून देण्याची अडचण असू शकते.[१] या क्रिया अशा प्रमाणात घडतात की व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मकरित्या परिणाम होतो.[१] हे बरेचदा एका दिवसात एका तासापेक्षा अधिक वेळ घेते.[२] बऱ्याच प्रौढांना वागणुकींना काही अर्थ नसल्याचे समजते.[१] ही परिस्थिती हावभाव, चिंतातुरता विकार, आणि आत्महत्येच्यावाढत्या जोखमी यांच्याशी संबंधित आहे.[२][३]

छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार
OCD असलेल्या काही लोकांमध्ये वारंवार, बेसुमार हात धुणे हे घडू शकते
लक्षणेपुनःपुन्हा गोष्टी तपासण्याची गरज वाटते, विशिष्ट नित्यक्रम पुनःपुन्हा करणे, विशिष्ट विचार पुनःपुन्हा असणे[१]
गुंतागुंतहावभाव, चिंतातुरता विकार, आत्महत्या[२][३]
सामान्य प्रारंभ35 वर्षांच्या पूर्वी[१][२]
कारणेअज्ञात[१]
जोखिम घटकबालशोषण, ताण[२]
निदान पद्धतलक्षणांवर आधारित[२]
विभेदक निदानचिंतातुरता विकार, मुख्य नैराश्याचा विकार, खाण्याचा विकार, छंदिष्टपणा-अत्याग्रही व्यक्तिमत्वाचा विकार[२]
उपचारसमुपदेशन, निवडक सेरोटोनिन पुनर्शोषण अवरोधके, त्रिवलयी निराशा अवरोधक[४][५]
वारंवारता2.3%[६]

कारण अज्ञात आहे.[१] काही अनुवांशिक घटकांच्या एकसारख्या जोड्यांवर दोन्हीही एकसारख्या नसलेल्या जोड्यांपेक्षा बरेचदा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.[२] जोखीम घटकांमध्ये बालशोषण किंवा इतर तणाव-प्रेरित घटनेच्या इतिहासाचा समावेश होतो.[२] काही प्रकरणांमध्ये लागणझाल्याची घटना घडल्याचे नोंदविले गेले आहे.[२] निदान हे लक्षणांवर आधारित आहे आणि संबंधित इतर औषध किंवा वैद्यकीय कारणे नियमबाहय करणे आवश्यक आहे.[२] गुणांकनाच्या येल-ब्राऊन छंदिष्टपणा-अत्याग्रही मापनपट्टी (Y-BOCS) यासारख्या मापनपट्टया या तीव्रतेचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.[७] इतर विकारांमध्ये यासारख्याच लक्षणांसह प्रमुख चिंतातुरता विकार, खाण्याचा विकार, हावभाव विकार, आणि छंदिष्टपणा-अत्याग्रही व्यक्तिमत्त्व विकारयांचा समावेश होतो.[२]

उपचारांमध्ये समुपदेशन, जसे की आकलनविषयक वागणुकीसंबंधित चिकित्सा (CBT), आणि कधीकधी निराशा अवरोधक जसे की निवडक सेरोटोनिन पुनर्शोषण अवरोधके (SSRIs) किंवा क्लॉमिप्रॅमिनयांचा समावेश होतो.[४][५] OCD साठी CBT मध्ये पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनाला परवानगी नसताना समस्या कशामुळे येतात याबद्दलच्या वाढत्या अनावृत्तीचा समावेश होतो.[४] क्लॉमिप्रॅमिन हे SSRIs इतकेच चांगले काम करत असल्यासारखे दिसून आले तरी, त्याचे मोठे आनुषंगिक परिणाम असतात त्यामुळे सामान्यतः दुय्यम उपचार म्हणून राखून ठेवले जातात.[४] एटिपिकल ॲंटिससायकोटिक्स उपचार-प्रतिरोधक प्रकरणांमध्ये SSRIs च्या व्यतिरिक्त वापरताना हे उपयोगी असू शकते परंतु आनुषंगिक परिणामाच्या वाढीव जोखमीशी देखील संबंधित असू शकते.[५][८] उपचारांशिवाय, बरेचदा ही स्थिती काही दशके टिकते.[२]

सुमारे 2.3% लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्यातरी वेळी छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार परिणाम करतो.[६] दिलेल्या वर्षादरम्यान सुमारे 1.2% हा दर आहे आणि हे जगभरात घडत असते.[२] 35 वर्षे वयानंतर लक्षणे सुरू होणे असामान्य आहे आणि निम्म्याहून अधिक लोकांमध्ये ही समस्या 20 व्या वर्षापूर्वीच विकसित होते.[१][२] पुरुष व स्त्री यांच्यावर समसमान प्रमाणात परिणाम होतात.[१] इंग्रजीमध्ये, छंदिष्टपणा-अत्याग्रही हे शब्द बरेचदा OCD शी संबंधित नसताना अनौपचारिक रीतीने एखाद्या अतिशय दक्ष राहणाऱ्या, परिपूर्ण राहणाऱ्या, तल्लीन झालेल्या अन्यथा आसक्त असलेल्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात.[९]

References