आवर्त सारणी

मुलद्रव्याची मांडणी

आवर्त सारणी (इंग्लिश: Periodic Table, पिरियॉडिक टेबल) ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. डोबेरायनरची त्रिके, न्यूलॅंडची अष्टके). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.

मेंडेलीव्हची आवर्त सारणी

मेंडेलीवची आवर्त सारणी (इ.स. १८७२ची आवृत्ती)

इ.स. १८६९ साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरुवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीव्हला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.

मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली समस्थानिके मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.

आधुनिक आवर्त सारणी

इ.स. १९१३ मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे. मोस्लेने मेंडेलीव्हच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्त सारणी तयार केली.


आवर्त सारणी


वर्तुळाकार आवर्त सारणी. मध्यभागी दिमित्री मेंडेलीवचा चेहेरा कोरलेला आहे
दिमित्री मेंडेलीव


आवर्त सारणी - मूलद्रव्ये

संकेत कोषात ९२ मूलद्रव्यांची नावे दिलेली आहेत.[१] ट्रान्सलिटरल फाऊंडेशनने मूलद्रव्यांची मराठी आवर्त सारणी बनवली आहे. [२]

अणुवस्तुमान / अणुअंकसंकेतचिन्हइंग्रजी मूलद्रव्यमराठी मूलद्रव्यसमाईक

ऑक्सिडीभवनस्थिति

उ [H]hydrogenहायड्रोजन±1
या [He]heliumहेलियम0
ल [Li]lithiumलिथिअम+1
वि [Be]berylliumबेरिलीम+2
टा [B]boronबोरॉन+3
प्रां [C]carbonकोळसा(कार्बन)±4
भू [N]nitrogenनायट्रोजन−3
जा [O]oxygenप्राणवायू,ऑक्सिजन−2
त [F]fluorineफ्लूओरीने−1
१०शि [Ne]neonशिथिराति0
११क्षा [Na]sodiumक्षारातु+1
१२भ्रा [Mg]magnesiumभ्राजातु+2
१३स्फ [Al]aluminumस्फटयातु+3
१४सै [Si]siliconसैकता±4
१५भा [P]phosphorusभास्वर−3
१६शु [S]sulfurशुल्वारि−2
१७नी [Cl]chlorineनीरजी−1
१८मं [Ar]argonमंदाति0
१९द [K]potassiumदहातु+1
२०चू [Ca]calciumचूर्णातु+2
२१स्तो [Sc]scandiumस्तोकातु+3
२२रं [Ti]titaniumरंजातु+4,3,2
२३रो [V]vanadiumरोचातु+5,2,3,4
२४व [Cr]chromiumवर्णातु+3,2,6
२५लो [Mn]manganeseलोहक+2,3,4,6,7
२६अ [Fe]ironअयस्+3,2
२७के [Co]cobaltकेत्वातु+2,3
२८रू [Ni]nickelरूपक+2,3
२९ता [Cu]copperताम्र+2,1
३०कु [Zn]zincकुप्यातु+2
३१द्र [Ga]galliumद्रवातु+3
३२सि [Ge]germaniumसिकातु+4,2
३३ने [As]arsenicनेपाली±3,+5
३४मे [Se]seleniumमेचाग्नि+4,−2,+6
३५दु [Br]bromineदुराघ्री±1,+5
३६ली [Kr]kryptonलीनाति0
३७दी [Rb]rubidiumदीपातु+1
३८शो [Sr]strontiumशोणातु+2
३९भृ [Y]yttriumभृशला+3
४०गो [Zr]zirconiumगोमेदातु+4
४१का [Nb]niobiumकाशातु+5,3
४२सं [Mo]molybdenumसंवर्णातु+6,3,5
४३चे [Tc]technetiumचेष्टातु+7,4,6
४४नक [Ru]rutheniumनक्षरातु+4,3,6,8
४५ना [Rh]rhodiumनाम्लातु+3,4,6
४६नी [Pd]palladiumनिचूषातु+2,4
४७रज [Ag]silverरजत+1
४८मृ [Cd]cadmiumमृज्यातु+2
४९नै [In]indiumनैलातु+3
५०त्र [Sn]tinत्रपु+4,2
५१अं [Sb]antimonyअंजन+3,5
५२वं [Te]telluriumवंगक+4,6,−2
५३जं [I]iodineजंबुकी−1,+5,7
५४को [Xe]xenonकोटयाति0
५५द्यु [Cs]cesiumद्युतातु+1
५६ह [Ba]bariumहर्यातु+2
५७सु [La]lanthanumसुजारला+3
५८पु [Ce]ceriumपुष्कला+3,4
५९श्या [Pr]praseodymiumश्यामला+3,4
६०आ [Nd]neodymiumआपीतला+3
६१पि [Pm]promethiumपिविरला+3
६२धू [Sm]samariumधूसरला+3,2
६३किं [Eu]europiumकिंविरला+3,2
६४यो [Gd]gadoliniumयोनिला+3
६५इ [Tb]terbiumइद्‌‍भृशला+3,4
६६चु [Dy]dysprosiumचुम्बला+3
६७पां [Ho]holmiumपांडुला+3
६८र [Er]erbiumरक्तला+3
६९व्या [Tm]thuliumव्याहरिला+3,2
७०श्वे [Yb]ytterbiumश्वेतला+3,2
७१निर्व [Lu]lutetiumनिर्वर्णला+3
७२गा [Hf]hafniumगावातु+4
७३स [Ta]tantalumसहातु+5
७४च [W]tungstenचण्डातु+6,4
७५बा [Re]rheniumबाष्पातु+7,4,6
७६गु [Os]osmiumगुर्वातु+4,6,8
७७घ [Ir]iridiumघनातु+4,3,6
७८म [Pt]platinumमहातु+4,2
७९स्व [Au]goldस्वर्ण+3,1
८०पा [Hg]mercuryपारद+2,1
८१सितु [Tl]thalliumसिक्ष्यातु+1,3
८२सी [Pb]leadसीस+2,4
८३भि [Bi]bismuthभिदातु+3,5
८४तो [Po]poloniumतोयातु+4,2
८५ला [At]astatineलावणी
८६तै [Rn]radonतैजसाति0
८७क्षु [Fr]franciumक्षुद्रातु+1
८८ते [Ra]radiumतेजातु+2
८९ए [Ac]actiniumएजातु+3
९०ह्र [Th]thoriumह्रसातु+4
९१प्रै [Pa]protactiniumप्रैजातु+5,4
९२कि [U]uraniumकिरणातु+6,3,4,5
९३Npneptuniumneptunium+5,3,4,6
९४Puplutoniumplutonium+4,3,5,6
९५Amamericiumamericium+3,4,5,6
९६Cmcuriumcurium+3
९७Bkberkeliumberkelium+3,4
९८Cfcaliforniumcalifornium+3
९९Eseinsteiniumeinsteinium+3
१००Fmfermiumfermium+3
१०१Mdmendeleviummendelevium+3,2
१०२Nonobeliumnobelium+2,3
१०३Lrlawrenciumlawrencium+3
१०४Rfrutherfordiumrutherfordium
१०५Dbdubniumdubnium
१०६Sgseaborgiumseaborgium
१०७Bhbohriumbohrium
१०८Hshassiumhassium
१०९Mtmeitneriummeitnerium
११०Dsdarmstadtiumdarmstadtium
१११Rgroentgentiumroentgentium
११२Cncopernicumcopernicum
११३Uutununtriumununtrium
११४Flfleroviumflerovium
११५Uupununpentiumununpentium
११६Lvlivermoriumlivermorium
११७Uusununseptiumununseptium
११८Uuoununoctiumununoctium

मूलद्रव्य विषयावरील पुस्तके

  • आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (डाॅ. व्ही.एन. शिंदे)

हे सुद्धा पहा

मूलद्रव्य

References