एरियेल शॅरन

एरियेल शॅरन (हिब्रू: אריאל שרון; २६ फेब्रुवारी, १९२८ - ११ जानेवारी २०१४) हा इस्रायल देशाचा एक लष्करी अधिकारी व ११वा पंतप्रधान होता. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या शॅरनने इस्रायल सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, उर्जामंत्री इत्यादी अनेक पदे निभावली होती. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झाल्यामुळे तो कोमामध्ये गेला. त्यानंतरची ८ वर्षे ह्याच स्थितीमध्ये राहिल्यानंतर ११ जानेवारी २०१४ रोजी त्याचे निधन झाले.

एरियेल शॅरन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
७ मार्च २००१ – १४ एप्रिल २००६
मागीलएहूद बराक
पुढीलएहूद ओल्मर्ट

जन्म२६ फेब्रुवारी १९२८ (1928-02-26)
पॅलेस्टाइन
मृत्यू११ जानेवारी, २०१४ (वय ८५)
तेल अवीव, इस्रायल
राजकीय पक्षलिकुड
धर्मज्यू
सहीएरियेल शॅरनयांची सही

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: