कैकर
पक्ष्यांच्या प्रजाती
कैकर हा एक शिकारी पक्षी आहे. या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणघार, कांतर, मांसी, लंगड्या असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Western osprey म्हणतात. हिंदीमध्ये मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार म्हणतात. संस्कृतमध्ये कुरर, कुरल, पंकजित, मत्सकुरर, मत्स्यनाशन कुरर, सारस म्हणतात. गुजरातीमध्ये मच्छीमार, माछीमार म्हणतात. तेलगुमध्ये कोरमि गद्द म्हणतात.
ओळख
आकाराने अंदाजे घारीएवढा. गडद उदी रंगाचा पक्षी. डोके उदी पांढरे. शरीराचा खालचा भाग पांढरा. छातीवर रुंद उदी कंठा. त्यावरून ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखे.
वितरण
नेपाळच्या खोऱ्यात वर्षभर आढळून येतात. भारत, श्रीलंका, लक्षद्वीप, मालद्वीप आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.लडाख, काश्मीर, गढवाल, कुमावून आणि आसाम या भागात मार्च-एप्रिल या काळात वीण.
निवासस्थाने
सरोवरे, जलाशय आणि खाडी.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे