कोल्डप्ले

कोल्डप्ले हा एक ब्रिटिश ॲलटर्नेटिव रॉक बँड आहे जो १९९६ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी बकलँड यांनी बनविला होता.

कोल्डप्ले
प्रदर्शनानंतर कोल्डप्ले मंचावर (२००९) - डावीकडून : क्रिस मार्टिन, गाय बेर्रिमॅन, जॉनी बकलँड, विल चॅम्पियन
पार्श्वभूमी ची माहिती
निवासलंडन, इंग्लंड
शैलीॲलटर्नेटिव रॉक
सक्रिय वर्ष१९९६ पासून
जालपृष्ठcoldplay.com
वर्तमान सदस्य
क्रिस मार्टिन
गाय बेर्रिमॅन
जॉनी बकलँड
विल चॅम्पियन

इतिहास

क्रिस मार्टिन आणि जॉनी बकलॅंड ने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये असतांना पेक्टोरलझ नावाचा बॅण्ड बनवीवला. नंतर गाय बेरिमॅन या बँड मध्ये बॅसिस्ट म्हणून सामील झाले आणि त्या बँडचे नाव बदलून स्टारफिश ठेवले गेले . मग बँडचा शेवटचा सदस्य, विल चॅम्पियन, ड्रम वादक म्हणून बॅन्डमध्ये सामीलझाले त्यांचे पहिले तीन अल्बम रेकॉर्डिंग आणि रिलीझ करण्यापूर्वी, बँडने स्वतःचे नाव कोल्डप्ले ठेवले.[१]

नामांकन आणि पुरस्कार

कोल्डप्लेने त्यांच्या इतिहासात अमेरिकन संगीत पुरस्कारासह असंख्य संगीत पुरस्कार जिंकले आहेत. २००० साली रिलीज झालेल्या “येल्लो ”च्या रिलीजमुळे या बँडने जगभरात प्रशंसा मिळविली. या ब्रँडला नऊ ब्रिट अवॉर्ड्ससह विविध संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डिसेंबर २००९ मध्ये, रोलिंग स्टोन मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात वाचकांनी कोल्डप्लेला २००० च्या दशकातील चौथे सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून मत दिले. [२] कोल्डप्लेला सहा एमटीव्ही व्हिडिओ संगीत पुरस्कार, सात एमटीव्ही युरोप संगीत पुरस्कार, तीन जागतिक संगीत पुरस्कार, सात बिलबोर्ड संगीत आणि २९ नामांकनांपैकी सात ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.[३] २००९ मध्ये ५१व्या ग्रॅमी सात ग्रॅमी नामांकनांपैकी ६ पुरस्कार प्राप्त केल्यामुळे हे त्यांचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले.[४] कोल्डप्लेने जगभरात १० कोटीहून अधिक रेकॉर्ड विकले आहेत.[५]

सदस्य

  • गाय बेरीमन - बास, इन्स्ट्रुमेंटल व्होकल्स, हार्मोनिका, सारंगी, ध्वनिक गिटार (१९९६ पासून)
  • जॉनी बकलँड - लीड गिटार, इंस्ट्रूमेंटल व्होकल्स, टक्कर (१९९६ पासून)
  • विल चॅम्पियन - ड्रम, इंस्ट्रूमेंटल व्होकल्स, ताल गिटार, पियानो (१९९६ पासून)
  • क्रिस मार्टिन - आघाडीचा गायक, पियानो, ताल गिटार, कीबोर्ड (१९९६ पासून)
  • फिल हार्वी - कल्पक दिग्दर्शक (कोल्डप्ले द्वारे त्यांचा पाचवा सदस्य म्हणून मान्य)

अल्बम

  • पॅराशूट्स (२०००)
  • अ रश ऑफ ब्लड टू द हेड (२००२)
  • एक्स अँड वाय (२००५)
  • व्हिवाला व्हीदा किंवा डेथ अँड ऑल हिस फ्रेंड्स (२००८)
  • मायलो झायलोटो (२०११)
  • घोस्ट स्टोरीझ (२०१४)
  • अ हेड फुल ऑफ ड्रीम्स (२०१५)
  • एव्हरीडे लाईफ (२०१९)

मैफिल दौरे

  • पॅराशूट्स दौरा (२००० - २००१)
  • अ रश ऑफ ब्लड टू द हेड दौरा (२००२ - २००३)
  • ट्विस्टेड लॉजिक दौरा (२००५-२००७)
  • व्हिवाला व्हीदा दौरा (२००८-२०१०)
  • मायलो झायलोटो दौरा (२०११-२०१२)
  • घोस्ट स्टोरीझ दौरा (२०१४)
  • अ हेड फुल ऑफ ड्रीम्स दौरा (२०१६-२०१७)

संदर्भ