चेक विकिपीडिया

विकिपीडियाची चेक भाषेतील आवृत्ती

चेक विकिपीडिया (चेक: Česká Wikipedie) ही विकिपीडियाची चेक भाषेतील आवृत्ती आहे.[१][२][३]

चेक विकिपीडिया
चेक विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्यमुक्त ज्ञानकोश
प्रकारऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषाचेक
मालकविकिमीडिया फाउंडेशन
निर्मितीजिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवाhttp://cs.wikipedia.org/
व्यावसायिक?चॅरिटेबल
नोंदणीकरणवैकल्पिक
अनावरण३ मे, इ.स. २००२
आशय परवानाक्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

या विकिपीडियामध्ये ४.८ लाखाहून अधिक लेख, आणि २.५ हजाराहून जास्त सक्रिय वापरकर्ते आणि ३४ प्रशासक आहेत. ते ३ मे २००२[४] रोजी एस्पेरांतो विकिपीडियाच्या चेक संपादकाच्या विनंतीवरून तयार केले गेले.[५] तथापि, त्यावेळी विकिपीडिया युजमॉड सॉफ्टवेअरवर चालत असे. त्यावेळी झेक आवृत्तीचे तीन पृष्ठे मिडियाविकीवर स्विच करताना हरवले होते. सध्याचे सर्वात जुने संपादन १४ नोव्हेंबर २००२ रोजी मुख्य पृष्ठ पुन्हा उघडले तेव्हाचे आहे. २० ऑक्टोबर २००३ रोजी एस्पेरांतो विषयावरील अनेक लेख असलेली ह्या चेक आवृत्तीने १००० लेखांचा टप्पा गाठला. एप्रिल २००४ च्या अहवालात असे नमूद केले होते की त्यावेळी १८० नोंदणीकृत वापरकर्ते होते.[६]

जून २००५ मध्ये, चेक विकिपीडियाने १०,००० लेख गाठले आणि त्याच वर्षाच्या डिसेंबरमध्ये ते २०,००० वर पोहोचले.[७] या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अधिक माहितीसह मुख्य पृष्ठाची पुनर्रचना केली गेली. नोव्हेंबर २००६ पर्यंत यात ३०,००० लेखांपेक्षा अधिक होते [८] आणि जून २००८ मध्ये १,००,००० लेख असलेली ही २१ वी आवृत्ती झली.[९][१०][११] १० एप्रिल २०१५ पर्यंत ३,१९,१०० पेक्षा अधिक लेख, २९ प्रशासक, जवळजवळ २,९३,००० नोंदणीकृत वापरकर्ते आणि बरेच अतिशय सक्रिय योगदानकर्ते होते. डिसेंबर २००९ मध्ये चेक विकिपीडियावर योगदान करणाऱ्यांनी प्राग येथे एक परिषद घेतली.[१२]

२००८ मध्ये,चेक स्वयंसेवी संस्था विकिमीडिया चेक रिपब्लिकाची स्थापना, विनामूल्य मजकुराच्या लेखकांशी संप्रेषण करण्यास आणि चेक विकिपीडियाला लोकांपर्यंत पोहचवून चेक विकिपीडियाच्या समर्थनासाठी केली गेली.[१३] १० फेब्रुवारी २०१८ रोजी चेक विकिपीडियाने ४,००,००० लेख गाठले. २१ मार्च २०१९ रोजी युरोपीयन संघाच्या ११ आणि १३ कलमांचा निषेधासाठी चेक विकिपीडिया तात्पुरते बंद करण्यात आले.

हे देखील पहा

  • स्लोव्हाक विकिपीडिया

संदर्भ

बाह्य दुवे