जंगली म्हैस

सस्तन प्राण्यांच्या प्रजाती

भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[१]

आशियाई जंगली पाणम्हैस
काझीरंगामध्ये जंगली पाणम्हैस व तिचे वासरू
काझीरंगामध्ये जंगली पाणम्हैस व तिचे वासरू
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:युग्मखुरी
कूळ:गवयाद्य
उपकुळ:गोवंश
Tribe:बोविनी
जातकुळी:बुबालस
जीव:बु. बुबालिस (बु. अर्नी)
शास्त्रीय नाव
बुबालस बुबालिस (बु. अर्नी)
(लिन्नॉस, १७५८)

जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी आसामच्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.[२][३]

संदर्भ