जॉन इस्नर


जॉन रॉबर्ट इस्नर (इंग्लिश: John Robert Isner) हा एक व्यावसायिक अमेरिकन टेनिसपटू आहे. ए.टी.पी. एकेरी क्रमवारीमध्ये २२व्या क्रमांकावर असलेला इस्नर सध्याच्या घडीला अमेरिकेमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू आहे. आपल्या उत्तुंग सर्व्हिससाठी प्रसिद्ध असलेला इस्नर २०१० विंबल्डन स्पर्धेमध्ये झालेल्या विश्वविक्रमी सामन्यानंतर प्रसिद्धीझोतात आला. टेनिस इतिहासामधील सर्वाधिक लांबीच्या (११ तास ५ मिनिटे) व १६८ गेमच्या ह्या सामन्यामध्ये इस्नरने फ्रान्सच्या निकोलास महुतला 6–4, 3–6, 6–7(7–9), 7–6(7–3), 70–68 असे हरवले.

जॉन आइस्नर
Isner at the 2009 US Open
पूर्ण नावJohn Robert Isner
देशFlag of the United States अमेरिका
वास्तव्यटॅम्पा, फ्लोरिडा
जन्म२६ एप्रिल, १९८५ (1985-04-26) (वय: ३९)
ग्रीन्सबोरो, नॉर्थ कॅरोलिना
उंची६ फु ९ इं (२.०६ मी)
सुरुवात२००७
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकतUS$१,४९८,२५४
एकेरी
प्रदर्शन489–317
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९ (१६ एप्रिल २०१२)
दुहेरी
प्रदर्शन150–115
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २६
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१३.

इस्नरने आजवर दोन ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत