जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल (जर्मन: Georg Friedrich Händel, गेओर्ग फ्रीडरीश ह्यांडेल; २३ फेब्रुवारी १६८५ - १४ एप्रिल १७५९) हा जर्मनीमध्ये जन्मलेला एक ब्रिटिश संगीतकार होता. जर्मनीच्या हाले शहरामध्ये जन्मलेल्या हान्डेलने हाले, हांबुर्गइटली येथे बरोक संगीताचे शिक्षण घेतले व इ.स. १७१७ साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. हान्डेलने त्याच्या कार्यकाळात ४२ ऑपेरा व शेकडो इतर संगीत रचना लिहिल्या.

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल
George Frideric Handel
जन्म नावGeorg Friedrich Händel
जन्म२३ फेब्रुवारी १६८५ (1685-02-23)
हाले, पवित्र रोमन साम्राज्य (आजचा जर्मनी)
मृत्यू१४ एप्रिल, १७५९ (वय ७४)
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्वब्रिटिश
संगीत प्रकारऑपेरा
स्वाक्षरीजॉर्ज फ्रीडरिक हान्डेल ह्यांची स्वाक्षरी

योहान सेबास्टियन बाख व दोमेनिको स्कार्लाती ह्यांचा समकालीन राहिलेला हान्डेल बरोक संगीतामधील सर्वश्रेष्ठ रचनाकारांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: