द्रुतगती रेल्वे

द्रुतगती रेल्वे (इंग्लिश: High-speed rail) हा रेल्वे वाहतूकीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये रेल्वेगाडीचा वेग पारंपारिक गाड्यांपेक्षा अधिक असतो. द्रुतगती रेल्वेची अधिकृत व्याख्या नसली तरी साधारणपणे नव्या मार्गांवर २५० किमी/तास तर विद्यमान मार्गांवर २०० किमी/तास इतक्या वेगाने धावणाऱ्या गाड्या द्रुतगती रेल्वेमध्ये गणल्या जातात. द्रुतगती रेल्वेसाठी वेगळे लोहमार्ग बांधले जातात तसेच विशिष्ठ प्रकारची इंजिने, डबे इत्यादी वापरले जातात. जगातील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वे - तोकाइदो शिनकान्सेन, १९६४ साली जपानमधील तोक्योओसाका ह्या शहरांदरम्यान सुरू झाली.

जपान देशातील टोकियोओसाका ह्या दोन प्रमुख शहरांना जोडणारी तोकाइदो शिनकान्सेन ही जगातील सर्वात जुनी द्रुतगती रेल्वे आहे.

सध्या फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इटली, चीन, तैवान, दक्षिण कोरिया इत्यादी अनेक देशांमध्ये द्रुतगती रेल्वे कार्यरत आहे. फ्रान्समधील टीजीव्ही, जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस, जपानमधील शिंकान्सेन ह्या काही जगामधील प्रसिद्ध द्रुतगती रेल्वे आहेत. चीन देशाने गेल्या १५ वर्षांमध्ये देशभर द्रुतगती रेल्वेचे जाळे झपाट्याने उभे केले आहे व आजच्या घडीला चीन देशात सुमारे ३८,००० किमी लांबीचे द्रुतगती रेल्वेमार्ग आहेत. जगामधील एकूण द्रुतगती रेल्वेच्या दोन तृतियांश लांबीचे मार्ग केवळ चीनमध्येच आहेत. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे ही जगातील सर्वात जलद रेल्वे तसेच बीजिंग-क्वांगचौ-षेंचेन-हाँगकाँग द्रुतगती रेल्वे हा जगातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्ग हे दोन्ही चीन देशातच आहेत. तसेच तब्बल ४३१ किमी/तास इतक्या वेगाने धावणारी चुंबकीय शक्तीवर चालणारी मॅगलेव्ह गाडीदेखील चीनच्याच शांघाय शहरामध्ये कार्यरत आहे.

भारत देशामध्ये सध्या द्रुतगती रेल्वे कार्यरत नसली तरीही भारत सरकारने द्रुतगती रेल्वेमध्ये स्वारस्य दाखवले आहे. २०१६ साली भारत सरकार व भारतीय रेल्वेने राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ह्या संस्थेची निर्मिती केली. ह्या कंपनीमार्फत २०२० साली मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग ह्या देशातील पहिल्या द्रुतगती रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू झाले व २०२८ साली हा मार्ग खुला होण्याची अपेक्षा आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय गाडी अर्ध-द्रुतगती रेल्वेमध्ये गणण्यात येते.

देशानुसार कार्यरत द्रुतगती रेल्वेमार्गांची लांबी

खालील यादीमध्ये सर्वाधिक लांबीचे द्रुतगती रेल्वेमार्ग असणारे जगातील २० देश दर्शवले आहेत.

क्रमदेशखंडकार्यरत
(किमी)
बांधकाम
सुरू
(किमी)
एकूण
(किमी)
दर १ लाख लोकांमागे लांबी
(किमी)
कमाल वेग
(किमी/तास)
टीपा
 चीनआशिया३७,९००[१]३२,१००७०,०००[२]२.८३५०[३]५० किमी लांबीची शांघाय मॅगलेव्ह रेल्वे
 स्पेनयुरोप४,२०८१,४९७५,७०५[४]९.३३१०
 फ्रान्सयुरोप२,७३४५६०४,५३७६.१७३२०केवळ द्रुतगती मार्ग
१,२४३२२०सुधारित मार्ग
4  जर्मनीयुरोप१,२६७३,३२२६,२२६४.१७३००केवळ द्रुतगती मार्ग
१,८८५२५०सुधारित मार्ग
 जपानAsia२,७६५६५७३,४२२2.19३२०जगातील पहिली द्रुतगती रेल्वेसेवा
 इटलीयुरोप२,०१८९६५२,९८३३.०८३००
 युनायटेड किंग्डमयुरोप१०८६३०२,५५३२.७९३००केवळ द्रुतगती मार्ग
१,८१५२०१जुने सुधारित मार्ग
 स्वीडनयुरोप१,७०६[५]७१९२,४२५१६.७२०५सगळे सुधारित मार्ग आहेत
 दक्षिण कोरियाआशिया१,१९४७१३१,९०७२.०३०५
१०  तुर्कस्तानआशिया१,०१५५०८२,१७५१.०९३००नवे मार्ग
१०२५५०२००सुधारित मार्ग
११  रशियायुरोप८०७१,१००[६]१.९०७०.५३१,५२०
१२  ग्रीसयुरोप७००६९५१,३९५६.५२००
१३  फिनलंडयुरोप६२५२०१८२६१३.१२२०केवळ जुने सुधारित मार्ग
१४  उझबेकिस्तानआशिया६००५०६५०२.०२५०
१५  सौदी अरेबियाआशिया४५३२,३५४२,८०७१.३७३००मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे
१६  बेल्जियमयुरोप३५५१४८५०३३.४३००
१७  पोलंडयुरोप३५२४११७६५१.२१२००केवळ सुधारित मार्ग
१८  तैवानआशिया३४८५५[७]४०३१.४६३००
19  अमेरिकाउत्तर अमेरिका३०११,७८९२,१५१०.१३२४०केवळ सुधारित मार्ग
20  पोर्तुगालयुरोप२२७६२६८५३१.९८२२०केवळ सुधारित मार्ग

संदर्भ

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: