न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम

शास्त्रीय यांत्रिकी भौतिक कायदा

न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हे सांगते की विश्वातील प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदू एका बलाने आकर्षून घेते, जे त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती असते. (वेगळ्यापद्धतीने दोन गोलीय समान वस्तुमान त्यांचे वस्तुमान केंद्रातच जणू एकवटलेले आहे असे ते एकमेकांना आकर्षून आणि आकर्षिले जातात हे सिद्ध केले.) हा सामन्य भौतिक नियम न्यूटनने प्रायोगिक निरिक्षणांनी केलेल्या प्रतिस्थापनेने बनविला गेला आहे.[१] हे अभिजात यामिकीचे मुख्य अंग असून ५ जुलै १९६८ मध्ये पहिल्यांदा न्यूटनच्या पुस्तकात फिलॉसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका ("प्रिन्सिपिया") सूत्रबद्धपणे मांडले गेले. (जेव्हा न्यूटनचे पुस्तक १९८६ मध्ये रॉयल सोसायटीत मांडले गेले, तेव्हा रॉबर्ट हूकने न्यूटनने व्यस्तानुपाती नियम त्याच्याकडून मिळवल्याचा दावा केला – ह्यासाठी इतिहास पहा)आधुनिक भाषेत हा नियम खालीलप्रमाणे मांडला जातो:

प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदू दोन केंद्रांना जोडणाऱ्या रेषेत, एका बलाने आकर्षिते. हे बल दोन वस्तुमानांच्या गुणाकाराची समानुपाती आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती असते:[२]
,

where:

  • F - दोन वस्तुमानांमध्ये असलेले प्रयुक्त बल,
  • G - गुरुत्व स्थिरांक,
  • m - पहिले वस्तुमान,
  • m - दुसरे वस्तुमान, आणि
  • r - दोन वस्तुमानांच्या केंद्रांना जोडणारे अंतर.

Diagram of two masses attracting one another

संदर्भ