बुर्यातिया

बुर्यातिया प्रजासत्ताक (रशियन: Республика Бурятия, रेस्पुब्लिका बुर्यातिया; बुर्यात: Буряад Республика) हे रशियाच्या संघातील २१ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक आहे. मंगोलियाच्या उत्तरेस वसलेल्या या प्रजासत्ताकाची राजधानी उलान-उदे येथे आहे. बैकाल हे मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बुर्यातियाच्या पश्चिमेस स्थित आहे.

बुर्यातिया प्रजासत्ताक
Республика Бурятия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

बुर्यातिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
बुर्यातिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापना३० मे १९२३
राजधानीउलान-उदे
क्षेत्रफळ३,५१,३०० चौ. किमी (१,३५,६०० चौ. मैल)
लोकसंख्या९,७२,०२१ (इ.स. २०१०)
घनता२.७७ /चौ. किमी (७.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-BU
संकेतस्थळhttp://egov-buryatia.ru/

बुर्यातियाची लोकसंख्या २०१० साली ९.७२ लाख असून येथील ६० टक्के लोक रशियन तर ३० टक्के लोक बुर्यात वंशाचे आहेत.

बाह्य दुवे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: