भारतातील जागतिक वारसा स्थाने

भारत

संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. ही यादी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते.[१]

सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारकशिल्प किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्त्व स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[२] भारताने १४ नोव्हेंबर १९७७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले. त्यानंतर भारतातील विविध स्थळे यादीत समावेश करण्‍यासाठी पात्र ठरली.[३]

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. सप्टेंबर २०२३ नुसार, भारतात अशी ४२ स्थाने आहेत. यामध्ये ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. त्या आधी, इटली (५९), चीन (५७), जर्मनी (५२), फ्रान्स (५२), व स्पेन (५०) हे देश आहेत.

यादी

क्र.नावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
अजिंठा लेणी महाराष्ट्र१९८३242; 1983; i, ii, iii, vi (सांस्कृतिक)[४]
वेरूळ लेणी महाराष्ट्र१९८३243; 1983; (i)(iii)(vi) (सांस्कृतिक)[५]
आग्‍ऱ्याचा किल्ला उत्तर प्रदेश१९८३251; 1983; iii (सांस्कृतिक)[६][७]
ताज महाल उत्तर प्रदेश१९८३252; 1983;i (सांस्कृतिक)[८]
कोणार्क सूर्य मंदिर ओडिशा१९८४ 246; 1984;(i)(iii)(vi) (सांस्कृतिक)[९]
महाबलीपुरम येथील स्मारके तमिळनाडू१९८४249; 1984; (i)(ii)(iii)(vi) (सांस्कृतिक)[१०]
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम१९८५337; 1985; ix, x (नैसर्गिक)[११]
मानस राष्ट्रीय उद्यान[a] आसाम१९८५338; 1985; vii, ix, x (नैसर्गिक)[१२]
केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान१९८५340; 1985; (x) (नैसर्गिक)[१३]
१०गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट गोवा१९८६234; 1986; (ii)(iv)(vi) (सांस्कृतिक)[१४]
११खजुराहो येथील स्मारके मध्य प्रदेश१९८६240; 1986; (i) (सांस्कृतिक) (iii)[१५]
१२हंपी येथील स्मारके[b] कर्नाटक१९८६241bis; 1986; i, iii, iv (सांस्कृतिक)[१६]
१३फत्तेपूर सिक्री उत्तर प्रदेश१९८६255; 1986; ii, iii, iv (सांस्कृतिक)[१७]
१४पट्टदकल येथील स्मारके कर्नाटक१९८७239rev; iii, iv (सांस्कृतिक)[१८]
१५घारापुरी (एलिफंटा) लेणी महाराष्ट्र१९८७

244rev; i, iii (सांस्कृतिक) || [१९]

१६चोळ राजांची मंदिरे तमिळ नाडू१९८७250bis; ii, iii (सांस्कृतिक)[२०][२१]
१७सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल१९८७452; ix, x (नैसर्गिक)[२२][२३]
१८नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड१९८८335bis; viii, x (नैसर्गिक)[२४][२५]
१९सांचीचे बौद्ध स्मारके मध्य प्रदेश१९८९524; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)[२६]
२०हुमायूनची कबर दिल्ली१९९३232bis; ii, iv (सांस्कृतिक)[२७]
२१कुतुब मिनार व इतर स्मारके दिल्ली१९९३233; iv (सांस्कृतिक)[२८]
२२भारतातील पर्वतीय रेल्वे
(दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे,
आणि कालका−सिमला रेल्वे)
पश्चिम बंगाल,
तामिळनाडू,
हिमाचल प्रदेश
१९९९944ter; ii, iv (सांस्कृतिक)[२९]
२३महाबोधी विहार बिहार२००२1056rev; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)[३०]
२४भीमबेटका मध्य प्रदेश२००३925; iii, v (सांस्कृतिक)[३१]
२५छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र२००४945rev; ii, iv (सांस्कृतिक)[३२]
२६चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान गुजरात२००४1101; ii, iv, v, vi (सांस्कृतिक)[३३]
२७लाल किल्ला दिलली२००४231rev; ii, iii, vi (सांस्कृतिक)[३४]
२८जंतर मंतर, जयपूर राजस्थान२०१०1338; iii, vi (सांस्कृतिक)[३५]
२९पश्चिम घाट कर्नाटक,
महाराष्ट्र,
केरळ,
तामिळनाडू
२०१२1342rev; ix, x (नैसर्गिक)[३६]
३०राजस्थानचे डोंगरी किल्ले
(चित्तोडगढ, कुंभलगड, रणथंबोर,
गागरोन, अंबर, आणि जैसलमेर)
राजस्थान२०१३247rev; ii, iii (सांस्कृतिक)[३७]
३१रानी की वाव गुजरात२०१४922; i, iv (सांस्कृतिक)[३८]
३२ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश२०१४1406rev; x (नैसर्गिक)[३९]
३३नालंदा पुरातत्व स्थळ बिहार२०१६1502; iv, vi (सांस्कृतिक)[४०]
३४कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम२०१६1513; iii, vi, vii, x (मिश्र)[४१]
३५ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे
(चंदिगढ कॅपिटल कॉम्प्लेक्स)[c]
चंदिगढ२०१६1321rev; i, ii, vi (सांस्कृतिक)[४२]
३६अहमदाबादचे ऐतिहासिक शहर गुजरात२०१७1551; ii, v (सांस्कृतिक)[४३]
३७मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प महाराष्ट्र२०१८1480; ii, iv (सांस्कृतिक)[४४]
३८जयपूर शहर राजस्थान२०१९1605; ii, iv, vi (सांस्कृतिक)[४५]
३९काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदीर तेलंगणा२०२१1570; i, iii (सांस्कृतिक)[४६]
४०धोळावीरा गुजरात२०२१1645; iii, iv (सांस्कृतिक)[४७]
४१शांतिनिकेतन पश्चिम बंगाल२०२३1375; iv, vi (सांस्कृतिक)
४२होयसळ वास्तूशिल्प समूह
(चेन्नकेशव मंदिर, बेलूर, होयसळेश्वर मंदिरचेन्नकेशव मंदिर, सोमनाथपुरा )
कर्नाटक२०२३1670; i, ii, iv (सांस्कृतिक)
तळटीप

तात्पुरती यादी

जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवीलेलया स्थानांन व्यतिरिक्त, राष्ट्रे नामांकनासाठी विचारात घेऊ शकतील अशा तात्पुरत्या स्थळांची यादी बनवू शकतात. जागतिक वारसा यादीसाठी नामांकन केवळ तेव्हाच स्वीकारले जाते जेव्हा स्थान पूर्वी तात्पुरत्या यादीत सूचीबद्ध केले गेले असते.[४८] २०२२ पर्यंत, भारताने त्याच्या तात्पुरत्या यादीत ५२ स्थानांची यादी केली आहे.[४९][५०] भारताच्या तात्पुरती यादी ५० स्थाने आहेत.

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
बिष्णुपूर येथील मंदिरे पश्चिम बंगाल१९९८सांस्कृतिक[५१]
मत्तनचेरी पॅलेस, कोची केरळा१९९८सांस्कृतिक[५२]
मांडू येथील स्मारके मध्य प्रदेश१९९८सांस्कृतिक[५३]
सारनाथचे प्राचीन बौद्ध स्मारके
(धमेक स्तूप, अशोकस्तंभ, चौखंडी स्तूप)
उत्तर प्रदेश१९९८सांस्कृतिक[५४]
सुवर्णमंदिर पंजाब२००४सांस्कृतिक[५५]
ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली बेट आसाम२००४सांस्कृतिक[५६]
नामढापा अभयारण्य अरुणाचल प्रदेश२००६नैसर्गिक[५७]
भारतीय जंगली गाढव अभयारण्य, कच्छचे रण गुजरात२००६नैसर्गिक[५८]
न्योरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल२००९नैसर्गिक[५९]
१०मरु राष्ट्रीय उद्यान राजस्थान२००९नैसर्गिक[६०]
११भारतातील रेशीम मार्गावरील वसाहती
(१२ वसाहती)
बिहार, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, पुडुचेरी, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश२०१०सांस्कृतिक[६१]
१२हैदराबादची कुतुबशाही स्मारके
(गोवळकोंडा, कुतुबशाही कबरी, चारमिनार)
तेलंगणा२०१०सांस्कृतिक[६२]
१३काश्मीरमधील मुघल बाग
(६ बागा - चश्मेशाही बाग, शालीमार बाग, परी महाल, वेरीनाग, अचबल बाग आणि निशात बाग)
जम्मू आणि काश्मीर२०१०सांस्कृतिक[६३]
१४दिल्ली शहर दिल्ली२०१२सांस्कृतिक[६४]
१५दख्खन सल्तनतची स्मारके आणि किल्ले
(गुलबर्गा, बीदर, विजापूर, व हैदराबाद मधील स्मारके आणि किल्ले)
कर्नाटक, तेलंगणा२०१४सांस्कृतिक[६५]
१६सेल्युलर जेल अंदमान आणि निकोबार२०१४सांस्कृतिक[६६]
१७भारतातील प्रतिष्ठित साडी विणकामाचा समूह
(८ गावांचा समूह)
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम२०१४सांस्कृतिक[६७]
१८अपतानी सांस्कृतिक भूप्रदेश अरुणाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक[६८]
१९रंगनाथस्वामी मंदिर तामिळनाडू२०१४सांस्कृतिक[६९]
२०श्रीरंगपट्टणचे स्मारके कर्नाटक२०१४सांस्कृतिक[७०]
२१चिल्का सरोवर ओडिशा२०१४नैसर्गिक[७१]
२२पद्मनाभपुरम महाल तामिळनाडू२०१४सांस्कृतिक[७२]
२३भारताची सत्याग्रह चळवळीतील स्थाने
(२२ स्थानांचा समूह)
गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली२०१४सांस्कृतिक[७३]
२४थेमबांग गाव अरुणाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक[७४]
२५नर्कोन्दम बेट अंदमान आणि निकोबार२०१४नैसर्गिक[७५]
२६मैदाम
(आहोम साम्राज्यातील थडग्यावर रचलेले मातीचे ढीग)
आसाम२०१४सांस्कृतिक[७६]
२७एकमरा क्षेत्र, भुवनेश्वर ओडिशा२०१४सांस्कृतिक[७७]
२८बुर्झाहोम पुरातत्व स्थळ जम्मू आणि काश्मीर२०१४सांस्कृतिक[७८]
२९लोथल गुजरात२०१४सांस्कृतिक[७९]
३०भारतातील पर्वतीय रेल्वे (विस्तार)
(माथेरान डोंगरी रेल्वे व कांगडा व्हॅली रेल्वे)
महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक[८०]
३१चेट्टिनाड येथील तमिळ व्यापाऱ्यांचे गावांचे समूह
(११ गावांचा समूह)
तामिळनाडू२०१४सांस्कृतिक[८१]
३२लोटस टेंपल दिल्ली२०१४सांस्कृतिक[८२]
३३बादामी चालुक्य वास्तुकला
(ऐहोळे, बादामी, व पट्टदकल येथील वास्तुकला)
कर्नाटक२०१५सांस्कृतिक[८३]
३४भारतातील थंड वाळवंट सांस्कृतिक भूप्रदेश लडाख, हिमाचल प्रदेश२०१५मिश्र[८४]
३५ग्रांड ट्रंक रोडवरील स्थाने
(९३ स्थाने)
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल२०१५सांस्कृतिक[८५]
३६कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान मणिपूर२०१६मिश्र[८६]
३७गारो हिल्स राष्ट्रीय उद्यान मेघालय२०१८मिश्र[८७]
३८ओरछाचे वास्तुशिल्प मध्य प्रदेश२०१९सांस्कृतिक[८८]
३९वाराणसीचे घाट उत्तर प्रदेश२०२१सांस्कृतिक[८९]
४०कांचीपुरमची मंदिरे तामिळनाडू२०२१सांस्कृतिक[९०]
४१हायर बेनकलचे महापाषाण स्थान कर्नाटक२०२१सांस्कृतिक[९१]
४२नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट-लामेटाघाट मध्य प्रदेश२०२१नैसर्गिक[९२]
४३सातपुडा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश२०२१नैसर्गिक[९३]
४४महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तुकला
(१४ किल्ले)
महाराष्ट्र२०२१सांस्कृतिक[९४]
४५कोकण विभागातील कातळ खोदशिल्प महाराष्ट्र, गोवा२०२२सांस्कृतिक[९५]
४६जिवंत मूळांचे पूल मेघालय२०२२सांस्कृतिक[९६]
४७वीरभद्र मंदिर व अखंड नंदी, लेपाक्षी आंध्र प्रदेश२०२२सांस्कृतिक[९७]
४८मोढेराचे सूर्य मंदिर गुजरात२०२२सांस्कृतिक[९८]
४९वडनगर गुजरात२०२२सांस्कृतिक[९९]
५०उनाकोटीची दगडी शिल्पे त्रिपुरा२०२२सांस्कृतिक[१००]

संदर्भ

बाह्य दुवे