मर्काझी प्रांत

मर्काझी प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-मर्काझी ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. "मर्काझी" या शब्दाचा अर्थ "मध्यवर्ती" असा असला, तरी मर्काझी प्रांत इराणाच्या वर्तमान सीमांनुसार पश्चिम भागात वसला आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ २९,१२७ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार प्रांताची लोकसंख्या सुमारे १३.५ लाख आहे. इ.स. १९८० साली जुन्या मर्काझी प्रांताचे विभाजन करून वर्तमान मर्काझी प्रांत आणि तेहरान प्रांत यांची निर्मिती करण्यात आली, तसेच काही भाग इस्फहान, सेमनान, जंजान प्रांतांस जोडण्यात आले.

मर्काझी प्रांत
استان مرکزی
इराणचा प्रांत

मर्काझी प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
मर्काझी प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीअराक
क्षेत्रफळ२९,१२७ चौ. किमी (११,२४६ चौ. मैल)
लोकसंख्या१३,५१,२५७
घनता४६ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-00

अराक हे मर्काझी प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

बाह्य दुवे

  • "मर्काझी प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत).