मायकेल जॅक्सन

मायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स. १९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.[१][२]

मायकेल जॅक्सन

मायकेल जॅक्सन ’व्हाईट हाउस’मध्ये १९८४
उपाख्यमायकेल जो जॅक्सन
टोपणनावेमाईक
आयुष्य
जन्म२९ ऑगस्ट १९५८
जन्म स्थानगॅरी इंडियाना अमेरिका
मृत्यू२५ जून २००९
मृत्यू स्थानलॉस एंजेलस
मृत्यूचे कारणहृदय घात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्वअमेरिकन
देशअमेरिका
भाषाइंग्रजी
पारिवारिक माहिती
आईकॅथरीन
वडीलजोसेफ
जोडीदार१) लिसा प्रेसली २) रोव्ह
अपत्ये
नातेवाईक३ बहिणी आणि ६ भाऊ
संगीत कारकीर्द
कार्यगायक
पेशागायक, कवी, संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण निर्माता, व्यावसाईक
कार्य संस्थाद जाक्सन ५
कारकिर्दीचा काळ१९६४ - २००९
गौरव
पुरस्कारग्रॅमी ॲवॉर्ड - १३
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन :29 ऑगस्ट 1958ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगार-वर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर "जो" जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताची आवड बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते.[१]

पुरस्कार

  • अमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड - २६
  • अमेरिकन व्हिडियो ॲवॉर्ड - ४
  • एम.टी.व्ही. ॲवॉर्ड - १३
  • ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
  • गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड - २३
  • एनएएसीपी इमेज ॲवॉर्ड - १४
  • बिलबोर्ड ॲवॉर्ड - ४०
  • ब्रिट ॲवॉर्ड - ७
  • मोबो ॲवॉर्ड - १
  • रिया ॲवॉर्ड - ५६
  • वर्ल्ड म्युझिक ॲवॉर्ड - १३
  • सोल ट्रेन ॲवॉर्ड - १०

एकूण - ३९२

पुस्तके

मायकेल जॅक्सनसंबंधी इंग्रजी आणि इतर अनेक भाषांत पुस्तके लिहिली गेली आहेत.

मराठी पुस्तके

  • मायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी (मूळ इंग्रजी पुस्तक - ’मायकेल जॅक्सन ॲन्ड द मॅजिक’ - लेखक जे. रॅन्डी ताराबोरेली, मराठी अनुवाद - रेश्मा कुलकर्णी-पाठारे)


संदर्भ आणि नोंदी

Michael Jackson Biography in Marathi : मायकेल जॅक्सन यांचे जीवनचरित्र