लॉस एंजेलस

लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; En-us-los-angeles.ogg उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.

लॉस एंजेलस
Los Angeles
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
लॉस एंजेलस is located in कॅलिफोर्निया
लॉस एंजेलस
लॉस एंजेलस
लॉस एंजेलसचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
महापौर अँटोनिओ व्हिलारायगारोसा
क्षेत्रफळ १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,९२,६२१
  - घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.lacity.org


दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगरटोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[४][५] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.

शहर रचना

मलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेलसचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेलस शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेलस बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ.

लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी इतक्या विस्तारात पसरलेले आहे[६]

हवामान

लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[७]

लॉस एंजेलस (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर) साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से)68.1
(20.1)
69.6
(20.9)
69.8
(21)
73.1
(22.8)
74.5
(23.6)
79.5
(26.4)
83.8
(28.8)
84.8
(29.3)
83.3
(28.5)
79.0
(26.1)
73.2
(22.9)
68.7
(20.4)
75.6
(24.2)
दैनंदिन °फॅ (°से)58.3
(14.6)
60.0
(15.6)
60.7
(15.9)
63.8
(17.7)
66.2
(19)
70.5
(21.4)
74.2
(23.4)
75.2
(24)
74.0
(23.3)
69.5
(20.8)
62.9
(17.2)
58.5
(14.7)
66.2
(19)
सरासरी किमान °फॅ (°से)48.5
(9.2)
50.3
(10.2)
51.6
(10.9)
54.4
(12.4)
57.9
(14.4)
61.4
(16.3)
64.6
(18.1)
65.6
(18.7)
64.6
(18.1)
59.9
(15.5)
52.6
(11.4)
48.3
(9.1)
56.6
(13.7)
सरासरी पर्जन्य इंच (मिमी)3.33
(84.6)
3.68
(93.5)
3.14
(79.8)
0.83
(21.1)
0.31
(7.9)
0.06
(1.5)
0.01
(0.3)
0.13
(3.3)
0.32
(8.1)
0.37
(9.4)
1.05
(26.7)
1.91
(48.5)
15.14
(384.7)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.01 inch)6.56.06.43.01.30.60.30.51.22.03.14.335.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास225.3222.5267.0303.5276.2275.8364.1349.5278.5255.1217.3219.4३,२५४.२
स्रोत: NOAA[८][९]

खेळ

लॉस एंजेलस शहराने १९३२१९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघखेळलीगस्थानस्थापना
लॉस एंजेलस लेकर्सबास्केटबॉलनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनस्टेपल्स सेंटर१९४९
लॉस एंजेलस क्लिपर्सबास्केटबॉलनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनस्टेपल्स सेंटर१९८४
अ‍ॅनाहाइम डक्सआइस हॉकीनॅशनल हॉकी लीगहोंडा सेंटर१९९३
लॉस एंजेलस किंग्जआइस हॉकीनॅशनल हॉकी लीगस्टेपल्स सेंटर१९६७
लॉस एंजेलस डॉजर्सबेसबॉलमेजर लीग बेसबॉलडॉजर पार्क१९५८
लॉस एंजेलस एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइमबेसबॉलमेजर लीग बेसबॉलएंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम१९६१

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: