इंटरस्टेट ३५

इंटरस्टेट ३५ तथा आय-३५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता मिनेसोटा राज्यातील डुलुथ शहराला टेक्सास राज्यातील लारेडो शहराला जोडतो. मिनियापोलिस-सेंट पॉल आणि डॅलस-फोर्ट वर्थ ही महानगरे तसेच कॅन्सस सिटी, ओक्लाहोमा सिटी ही मोठी शहरे या महामार्गावर आहेत.

अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-३५
Interstate 35 map.png
लांबी२,५२५.१६ किमी
सुरुवातडुलुथ, मिनेसोटा
मुख्य शहरेमिनियापोलिस-सेंट पॉल, दे मॉइन, कॅन्सस सिटी, ओक्लाहोमा सिटी, डॅलस-फोर्ट वर्थ, ऑस्टिन, सान ॲंटोनियो
शेवटलारेडो, टेक्सास
जुळणारे प्रमुख महामार्गआय-९४ (मिनियापोलिस, मिनेसोटा)
आय-९० (आल्बर्ट ली, मिनेसोटा)
आय-८० (दे मॉइन, आयोवा)
आय-२९ (कॅन्सस सिटी, मिसूरी)
आय-७० (कॅन्सस सिटी, मिसूरी)
आय-४४ (ओक्लाहोमा सिटी, ओक्लाहोमा)
आय-१४ (बेल्टन, टेक्सास)
आय-३७ (सान ॲंटोनियो, टेक्सास)
आय-१० (सान ॲंटोनियो, टेक्सास
राज्येकॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

हा महामार्ग १,५६९.०६ मैल (२,५२५.१६ किमी) लांबीचा असून तो मिनेसोटा, आयोवा, मिसूरी, ओक्लाहोमा आणि टेक्सास राज्यांतून जातो.

आय-३५ मिनियापोलिस-सेंट पॉल आणि डॅलस-फोर्ट वर्थ या जुळ्या शहरांत प्रवेशताना त्याचे आय-३५ई आणि आय-३५डब्ल्यू असे दोन भाग होतात व शहराबाहेर पडल्यावर दोन्ही भाग एकत्र येऊन पुन्हा आय-३५ नावाने ओळखले जातात. आय-६९ खेरीज आय-३५ हा असे एकाक्षरी विसर्ग असलेला अमेरिकेतील दुसरा महामार्ग आहे. इतर सगळ्या महामार्गांतून फाटे फुटल्यावर त्यांना तीन आकडी क्रमांक दिले जातात.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन