कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया (इंग्लिश: California) हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे (अलास्काटेक्सास खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.

कॅलिफोर्निया
California
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: द गोल्डन स्टेट (The Golden State)
ब्रीदवाक्य: Eureka
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीसाक्रामेंटो
मोठे शहरलॉस एंजेलस
क्षेत्रफळ अमेरिकेत ३वा क्रमांक
 - एकूण४,२३,९७० किमी² 
  - रुंदी४०० किमी 
  - लांबी१,२४० किमी 
 - % पाणी४.७
लोकसंख्या अमेरिकेत १वा क्रमांक
 - एकूण३,७२,५३,९५६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता९०.५/किमी² (अमेरिकेत ११वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $६१,०२१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश९ सप्टेंबर १८५० (३१वा क्रमांक)
संक्षेप  US-CA
संकेतस्थळca.gov

कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडाऍरिझोना ही राज्ये आहेत. सॅक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून लॉस ऍन्जलीस हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. लॉस ऍन्जलीस येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणाऱ्या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्रअब्ज इतका आहे.

मोठी शहरे

खालील १० शहरे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.

क्रमशहरलोकसंख्याचित्रवर्णन
लॉस ऍन्जलीस३७,९२,६२१ अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे व देशाच्या अर्थकारणामधील आघाडीचे शहर. हॉलिवूड येथील सिनेउद्योग जगातील सर्वात मोठा आहे.
सॅन डियेगो१३,०७,४०२ हे शहर अमेरिकेमधील सर्वात राहण्यायोग्य शहर मानले जाते.
सॅन होजे९,४५,९४२ अमेरिकेतील दहाव्या क्रमांकाचे व सिलिकॉन व्हॅलीमधील प्रमुख शहर.
सॅन फ्रॅन्सिस्को८,०५,२३५ एक आंतरराष्ट्रीय पर्यटनकेंद्र.
फ्रेस्नो५,०२,३०३ कॅलिफोर्नियाच्या कृषीप्रधान भागातील एक मोठे शहर.
सॅक्रामेंटो४,९०,४८८ उत्तर भागात वसलेले हे शहर कॅलिफोर्नियाची राजधानी आहे.
लॉंग बीच४,६२,२५७ लॉस ऍन्जलीसचे उपनगर असलेले हे शहर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे.
ओकलंड३,९०,७२४ सॅन फ्रॅन्सिस्को भागातील एक मोठे शहर
बेकर्सफील्ड३,४७,४८३ कॅलिफोर्नियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर.
१०ऍनाहाइम३,३६,२६५ ऑरेंज काउंटीमधीला सर्वात मोठे शहर

गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: