ई-पुस्तक

ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर. या प्रकारच्या पुस्तकात मजकूर, चित्रे किंंवा दोन्ही असू शकते, जे संगणक किंवा मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारज वाचले जाते.[१]


जरी याला पुस्तकाचे "डिजीटल रूपांतर" म्हटले जात असले, तरी काही पुस्तके ही फक्त ई-पुस्तके म्हणूनच प्रकाशित केली जातात. ई-पुस्तके ई-बुक रीडर या खास वाचण्यासाठी तयार केलेल्या उपकरणावर वाचली जाऊ शकतात, त्यासोबतच संगणक, टॅब्लेट्स, लॅपटॉप किंंवा मोबाईल फोनद्वारे वाचता येतात.


पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररूपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.[२]

हे सुद्धा पहा

संदर्भ