उंट

उंट (लॅटिन: camelus) [१] [२] हा कॅमेलस वंशातील एक समखुरी प्राणि-गणातल्या टायलोपोडा उपगणातील एक प्राणी आहे. त्याच्या पाठीवर "मदार" म्हणून ओळखले जाणारे विशिष्ट चरबीचे साठे असतात. उंट फार पूर्वीपासून पाळले जातात आणि पशुधन म्हणून ते अन्न (दूध आणि मांस) तसेच कापड देखील प्रदान करतात. उंट हे काम करणारे प्राणी आहेत जे विशेषतः त्यांच्या वाळवंटातील निवासस्थानासाठी अनुकूल आहेत. हे प्राणी प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीसाठी एक महत्त्वाचे साधन आहे.

ड्रोमेडरी/अरबी उंट

उंटाच्या तीन जिवंत प्रजाती आहेत. जगातील उंटांच्या एकूण लोकसंख्येपैकी एक-कुबड ड्रोमेडरी किंवा अरबी उंटांची संख्या ९४% आहे आणि दोन-कुबड असलेला बॅक्ट्रियन उंटांची संख्या ६% आहे. तर जंगली बॅक्ट्रियन उंट ही एक वेगळी प्रजाती आहे, जी आता गंभीरपणे धोक्यात आहे.

ऊंट
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:पृष्ठवंशी
जात:सस्तन
वर्ग:युग्मखुरी
कुळ:कॅमेलिडे
जातकुळी:कॅमेलस
लिन्नॉस, १७५८
बॅक्ट्रियन उंट

उंट हा शब्द अनौपचारिक रीतीने व्यापक अर्थानेही वापरला जातो, जेथे कॅमेलिड कुटुंबातील सर्व सात प्रजातींचा समावेश करण्यासाठी अधिक योग्य शब्द "कॅमेलिड" आहे. यामध्ये खरे उंट (वरील तीन प्रजाती) आणि पुढील "न्यू वर्ल्ड" जातीच्या उंटांचा समावेश होतो: लामा, अल्पाका, गुआनाको, आणि विकुना, जे लॅमिनी या स्वतंत्र जमातीशी संबंधित आहेत. [३] या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत. उत्तर अमेरिकेइओसीन काळात उंटांचा उगम झाला होता. पॅराकेमेलस हे आधुनिक उंटांचे पूर्वज बेरिंग लँड ब्रिज ओलांडून आशियामध्ये सुमारे ६ दशलक्ष वर्षांपूर्वी मायोसीनच्या उत्तरार्धात स्थलांतरित झाले होते.

उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. तर लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.

वर्गीकरण

अस्तित्वात असलेल्या प्रजाती

3 प्रजाती अस्तित्वात आहेत: [४] [५]

प्रतिमासामान्य नावशास्त्रीय नाववितरण
बॅक्ट्रियन उंटकॅमेलस बॅक्ट्रियनसपाळीव; बॅक्ट्रियाच्या ऐतिहासिक प्रदेशासह मध्य आशिया मध्ये अधिवास
ड्रोमेडरी / अरेबियन उंटकॅमेलस ड्रोमेडेरियसपाळीव; मध्य पूर्व, सहारा वाळवंट आणि दक्षिण आशिया ; ऑस्ट्रेलिया
जंगली बॅक्ट्रियन उंटकॅमेलस फेरसवायव्य चीन आणि मंगोलियातील दुर्गम भाग

इतिहास

उंटांच्या अवषेशांवरून असे सिद्ध झाले आहे की एक वाशींडी उंट हे मुलतः अमेरिकेतून अलास्का मार्गे आशिया खंडात पसरले असे मानले जाते. तर दोन वाशींडांचे उंट मूलतः तुर्कस्तानच्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पू्र्वी तुर्कस्तानला बॅक्ट्रीया असे नाव होते त्यावरून बॅक्ट्रीयन उंट असे नाव या प्राण्याला पडले.

वास्तव्य

आज जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंडात सोमालिया, सुदान या देशांच्या आसपास आढळतात.तसेच आशिया खंडात मंगोलिया, चीन, अफगाणिस्तान, इराक या भागातही आढळतात. भारतातही राजस्थान येथे उंट आढळतात.

वरील सर्व भागातील उंट हे मुख्यतः माणसाळवले गेले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्य भागात अजूनही नैसर्गिक उंट आहेत. यांची संख्या सुमारे सात लाख इतकी आहे व त्यांचे प्रजनन ११% दराने वाढते आहे.

वंश विषयक

उंट वा लामा यांच्या एकत्रित प्रजोत्पादनाचे प्रयत्न झाले आहेत.तसेच एक व दोन वाशींडी उंटाचे प्रजननही केले जाते. यांना 'बुख्त' असे संबोधन आहे. हे साधारणपणे कझाकिस्तान या प्रदेशात आढळतात.

निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता

उंट अन्न चरबीच्या रूपात वाशींडां मध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो.उंटांच्या लाल पेशीचा आकार अंडाकृती असतो यामुळे कमी पाणी शरीरात असतांनाही त्या कार्यरत राहतात.

उपयोग

सुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते. लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.

उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.

उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते.उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.

जैसलमेर वाळवंट महोत्सवात हे उंट आहे.

संदर्भ

<style data-mw-deduplicate="TemplateStyles:r1954978">.mw-parser-output .reflist{font-size:90%;margin-bottom:0.5em;list-style-type:decimal}.mw-parser-output .reflist .references{font-size:100%;margin-bottom:0;list-style-type:inherit}.mw-parser-output .reflist-columns-2{column-width:30em}.mw-parser-output .reflist-columns-3{column-width:25em}.mw-parser-output .reflist-columns{margin-top:0.3em}.mw-parser-output .reflist-columns ol{margin-top:0}.mw-parser-output .reflist-columns li{page-break-inside:avoid;break-inside:avoid-column}.mw-parser-output .reflist-upper-alpha{list-style-type:upper-alpha}.mw-parser-output .reflist-upper-roman{list-style-type:upper-roman}.mw-parser-output .reflist-lower-alpha{list-style-type:lower-alpha}.mw-parser-output .reflist-lower-greek{list-style-type:lower-greek}.mw-parser-output .reflist-lower-roman{list-style-type:lower-roman}</style>

बाह्य दुवे