महाराष्ट्र ओपन

टेनिस स्पर्धा
(चेन्नई ओपन या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्र ओपन ही भारताच्या पुणे शहरामध्ये आयोजित केली जाणारी एक वार्षिक पुरुष टेनिस स्पर्धा आहे. पुण्यातील हार्ड कोर्टवर खेळवली जाणारी ही स्पर्धा ए.टी.पी.च्या ए.टी.पी. वर्ल्ड टूर २५० सीरीज ह्या शृंखलेचा भाग आहे. १९९६ साली सर्वप्रथम ह्या स्पर्धेचे आयोजन केले गेले. आजवर रफायेल नदाल, बोरिस बेकर, रिचर्ड क्रायजेक इत्यादी प्रसिद्ध टेनिसपटूंनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.

एसडॅट टेनिस स्टेडियम
२०११ चेन्नई ओपनमधील दुहेरी सामन्यामध्ये लिअँडर पेसमहेश भूपती

प्रारंभिक कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते चेन्नईला हलवण्यात आले होते आणि २०१८ पासून ही स्पर्धा पुण्यात गेले, जिथे ते जानेवारीमध्ये आयोजित केले जाते. [१] [२]

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन या संस्थांद्वारे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. [३]

गतविजेते

एकेरी

वर्षविजेता
२०२० जिरी वेसेली
२०१९ केव्हिन अँडरसन
२०१८ जिल सिमाँ
२०१७ रॉबर्टो बॉटिस्टा आगुत
२०१६ स्तानिस्लास वावरिंका
२०१५ स्तानिस्लास वावरिंका
२०१४ स्तानिस्लास वावरिंका
२०१३ यांको टिप्सारेविच
२०१२ मिलोस राओनिक
२०११ स्तानिस्लास वावरिंका
२०१० मारिन चिलिच
२००९ मारिन चिलिच
२००८ मिखाइल यूझनी
०२००७ जाविए मॅलिस
२००६ इव्हान ल्युबिचिच
२००५ कार्लोस मोया
२००४ कार्लोस मोया
२००३ पारादोर्न श्रीचफन
२००२ ग्वियेर्मो कॅन्यास
२००१ मिकाल तबारा
२००० जेरोम गोल्मर
१९९९ बायरन ब्लॅक
१९९८ पॅट्रिक राफ्टर
१९९७ मिकाएल टिलस्ट्रॉम
१९९६ थॉमस एंक्विस्ट

भारताच्या सोमदेव देववर्मनने २००९ साली उपविजेतेपद मिळवले होते.

दुहेरी

दुहेरीमध्ये ही स्पर्धा भारताच्या लिअँडर पेसमहेश भूपती ह्या जोडीने पाच वेळा (१९९७, १९९८, १९९९, २००२ व २०११) जिंकली असून २०१२ साली पेसने यांको टिप्सारेविच सोबत दुहेरीमधील अजिंक्यपद मिळवले.


संदर्भ

बाह्य दुवे