ज्युलियस सीझर

गैयस ज्युलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमन प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता.

ज्यूलिअस सीझर
रोमन साम्राज्याचा संस्थापक
अधिकारकाळऑक्टोबर, इ.स.पू. ४९ ते १५ मार्च, इ.स.पू. ४४
पूर्ण नावगैयस ज्यूलिअस सीझर
जन्मजुलै, इ.स.पू. १००
सुबुरा, रोम
मृत्यू१५ मार्च, इ.स.पू. ४४
क्यूरिआ ऑफ पॉंपेई, रोम
वडीलगैयस ज्युलियस सीझर द एल्डर
आईऔरेलिआ कॉट्टा
पत्नीकॉर्नेलिना सिन्ना मायनर
इतर पत्नीपॉंपेईआ
कॅलपर्निआ पिझोनीस
क्लिओपात्रा ७ फिलोपातोर

याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस ज्युलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी ज्युलियस) असे ठेवून घेतले.