डान्झिगचे स्वतंत्र शहर

डान्झिगचे स्वतंत्र शहर (जर्मन: Freie Stadt Danzig फ्राई श्टाट डान्झिग, पोलिश: Wolne Miasto Gdańsk वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क), आजचे गदान्स्क, हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना जानेवारी १०, इ.स. १९२० रोजी व्हर्सायच्या तहातील भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.[१]

या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. लीग ऑफ नेशन्सच्या हुकुमानुसार हा भाग वायमार प्रजासत्ताकपासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या पोलंड देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे स्वतंत्र शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.[२]

संदर्भ आणि नोंदी