पश्चिम सहारा

पश्चिम सहारा हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाच्या अंमलाखालील एक वादग्रस्त भूभाग आहे. सहारा वाळवंटाने व्यापलेला पश्चिम सहारा हा जगातील सर्वात विरळ लोकवस्ती असलेल्या भागांपैकी एक आहे. सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा अंशतः मान्य देश पश्चिम सहारावर आपला अधिकार सांगतो.

पश्चिम सहाराचे आफ्रिकेतील स्थान

हा प्रदेश एकोणिसाव्या शतकाअखेरपासून स्पेनने व्यापला होता. इ.स. १९६३मध्ये मोरोक्कोने त्यास विरोध दर्शविल्यावर याला संयुक्त राष्ट्रांच्या पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशांच्या यादीत घालण्यात आले.[१]

संदर्भ आणि नोंदी